अशोक गायकवाड
अलिबाग : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या नेतृत्वाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पाच पुरुष व एक महिला या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा हद्दीमध्ये गेले दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत होती. त्याअनुषंगाने १२ जानेवारीला महाड एमआयडीसी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि, मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथे काही बांगलादेशी कामगार त्यांचे अस्तित्व लपवून अवैधरीत्या घुसखोरी करून वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करीत आहे. त्या अनुषंगाने महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी येथे चंद्रकांत शिंदे याचे घरात छापा टाकला असता त्यामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांना अवैधरीत्या वास्तव्यास असलेले ०६ बांगलादेशी नागरिक मिळून आले. त्यांना मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथून ताब्यात घेण्यात आले. सदर बांगलादेशी नागरिकांना पी.डी.आय.पी.एल या बांधकाम कंपनीने कामावर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बांगलादेशी नागरीकांकडे पोलिसांनी बांगलादेशातून भारतात येण्याकरिता वैध प्रवासी कागदपत्राची मागणी केली असता त्या इसमांनी आमच्या कडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. आम्ही बांगलादेशातील गरिबी व उपासमारीस कंटाळून रोजगाराकरिता सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केलेला आहे. अशी माहिती दिल्याने सदर इसमांनविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०६/२०२५ कलम ३ (१) (अ ) परकीय नागरिक आदेश १९४८, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४, पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० चे कलम ३ (अ ) ६(अ ) प्रमाणे बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहे. १) माणिक तुफेझेल विशष वय ३२ वर्ष धंदा सेंट्रिंग चे काम सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. सुबोधपुर बडतळा बाजार, पो. ठाणे दश्शोना, जि. चौंडगा जोषारे खुलना, देश -बांगलादेश, २) नूर इस्माल बिस वास उर्फ सिकंदर रोने मानेरूलखान वय ३० वर्ष सध्या रा. वरंध ता. महाड जि. रायगड मूळ रा. बासग्रॅम, पोलीस ठाणे कालिया, विभाग खुलना जि. नोडाई, देश बांगलादेश, ३) सागर मिराज शेख वय ३० वर्ष रा. पिंपळदरी ता.महाड जि. रायगड मूळ रा.उत्तर शिंगे, पोलीस ठाणा नोडल, जि. नोडल विभाग खुलना, देश बांगलादेश, ४) शांतु शकुरअली शेख वय-१९ वर्ष सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. पुरुलिया, पोलीस ठाणा कालिया, जि. नाडाई विभाग खुलना, देश- बांगलादेश., ५) शिलीम हामशेर परामणी वय-४० वर्ष, सध्या राहणार पिंपळदरी तालुका महाड जिल्हा रायगड, मूळ रा अब्दुलपुर ठाणा-लालपुर जिल्हा नाटोर विभाग रासई देश बांगलादेश असे पाच पुरुष व एक महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव विभाग पुष्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी प्रभारी सपोनि/जीवन माने व पोसई/संजय मुंडे, पोसई/समेळ सुर्वे. सफौ/हनुमंत पवार, सफौ/दीपक ढेपे, पोह/राजेश गोरेगावकर, पोह/चनप्पा अंबरगे, पोह/सिद्धेश मोरे, पोना/राजेश माने, पोना/सतीश बोटे,पोना/गणेश भैलुमे,पोशी/सुनील पाटील, पोशी/सुनीलकांजर, पोशी/शीतल, बंडगर, पोशी/निखीलबळे, पोशी/अमोल कुंभार, पोशी/शुभम पवार, पोशी/सुजील गोंधळी, पोशी/सागर गुलींग, पोशी/विजय दळवे मपोशी/ तेजश्री भोईर, यांनी गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *