नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ११ जानेवारी रोजी केमिस्ट भवन येथे १५ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला, अशी माहिती मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव मारुती विश्वासराव यांनी दिली
या मेळाव्यासाठी सानपाडा येथील  नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनीलशेठ छाजेड व अध्यक्ष राकेशशेठ नलावडे, नगरसेवक सोमनाथ वासकर,  समाजसेवक भाऊ भापकर, सुनिल कुरकुटे, जगन्नाथ दशरथ जगताप उर्फ आबा .  मिलिंद सूर्याराव,  पांडुरंग आमले, बाबाजी इंदोरे, शंकरशेठ माटे, विसाजी लोके,  सुभाषशेठ  थोरात, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे  उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, सानपाडा पोलीस स्टेशनच्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मती रानवडे, जुन्नर आंबेगाव मुलुंड मंडळाचे प्रतिनिधी भालेराव, पत्रकार रवींद्र आवटी, आदी मान्यवरांनी आर्थिक सहकार्य करून वधूवरांना व पालकांना शुभेच्छा दिल्या.  डॉ. राजपाल उसनाळे,  समाजसेवक विसाजी लोके, सानपाडा पोलीस स्टेशनच्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मती रानवडे,   शामराव मोरे,  लक्ष्मण कोरडे, गणपत पाटील, रमेश शेट्ये, नाना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळासाहेब नलावडे, बबन भालेराव, जालिंदर भोर, किरण नलावडे, विष्णुदास मुखेकर, ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी पाटील, कृष्णा ऊतेकर, कोंडीबा पाबळे, धोंडीराम बोरचटे,  अरुण रोडे पाटील, कांताराम जाधव, देवराम भोर, कर्मचारी दिपाली पाटील विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यात ४५०  वधू – वर व पालक  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *