मुंबई : माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलुंडमध्ये नुकताच ममता दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त शिवसेना मुलुंड विधानसभा क्षेत्रातील ठाकरे शिवसेनेच्या शाखा क्रं १०८ व फँमिली प्लॅनिग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई तर्फे महिलां पुरुषांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, स्त्री रोग चिकित्सा ,मासिक पाळी आणि युरीन इन्फेकशन,गर्भाशय मुखाची तपासणी तर पुरुष व महिलांच्या तोंडाच्या कर्करोगाची तपासणी,ब्लड हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड शुगर तपासणी करुन वजन वाढीवर उपाय व सल्ला वैद्यकीय तज्ज्ञानी यावेळी दिला.या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेऊन या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी महिला विधानसभा प्रमुख नंदिनीताई सावंत, उपविभागप्रमुख दिनेश जाधव,उपविभागसंघटक हेमलता सुकाळे, सुनीता धोंगडे, माजी शाखाप्रमुख रमेश वीरकर, बाबा भगत,रोहिदास देवाडे युवासेना समन्वयक संदेश मोढवे,स्वप्नील सुर्यवंशी ,राजेश बिचवे,अनिल आगळे , सतीश बंदरकर,आकाश रोडे , संगीता पालव, नीता मोरे, रेश्मा वानखडे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. या शिबीराचे आयोजन शाखाप्रमुख शैलेश पवार यांनी केले होते.
