चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई : ओढ हिरवळी आणि माझगाव येथील सर एली कदुरी शाळेतर्फ विविध वयोगटासाठी चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १६ वर्षाखालील वयोगटात लोबो फेरडीनने ४.५ गुण मिळवत विजेतेपद पटकवलं. तर समर्थ साळगांवकरने ४ गुणांसह दूसरा क्रमांक पटकावला. मुंबई जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत विविध आठ वयोगटात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
माझगाव येथील सर एली कदुरी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील विजेत्यांना एकुण ३० हजार रुपयांची बक्षिसे आणि ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र देण्यात आली. स्पर्धेला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण आणि सारस्वत बँकेचा पुरस्कार लाभला.
पत्रकरांच्या गटात लोकमतचे सहाय्यक संपादक पवन देशपांडे विजयी
पत्राकरांसाठी ठेवण्यात आलेल्या विशेष स्पर्धेत विविध माध्यमांच्या पत्रकारांनी भाग घेत स्पर्धेची चुरस वाढवली. यात लोकमत वृतपत्राचे सहाय्यक संपादक पवन देशपांडे यांनी बाजी मारत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं. तर लोकमत समूहाचे क्रीडा प्रतिनिधी रोहित नाईक आणि न्यूज नेशन वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राजेश माळकर यांच्या गुणांमध्ये बरोबरी झाली. आणि दोघांमध्ये झालेल्या निर्णायक बोर्डमध्ये रोहित नाईक यांनी विजयी गुण संपादन करत दूसरा क्रमांक पटकावला. राजेश माळकर हे तिसऱ्या स्थानावर होते.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे –
१६ वर्षाखाली वयोगट – कै. एस्तेर पेणकर स्मृती चषक
पहिला क्रमांक – लोबो फेरडीन(४.५ गुण)
दूसरा क्रमांक- समर्थ साळगांवकर(४ गुण)
तिसरा क्रमांक- आरव राव (३.५ गुण)
१३ वर्षाखाली वयोगट – कै. रेमंड पेणकर स्मृती चषक
पहिला क्रमांक – सर्वेश पांढरे (४ गुण)
दूसरा क्रमांक- पागाड आर्यन (४ गुण)
तिसरा क्रमांक- लोबो फेरडीन (३.५ गुण)
१२ वर्षाखाली वयोगट – कै. सदानंद चव्हाण स्मृती चषक
पहिला क्रमांक – भावा प्रणीत (४.५ गुण)
दूसरा क्रमांक- रिधान सूंद्राणी (४ गुण)
तिसरा क्रमांक- क्रिश चांदवानी (४ गुण)
११ वर्षाखाली वयोगट – कै. नंदकुमार जांभेकर स्मृती चषक
पहिला क्रमांक – नील भट (५ गुण)
दूसरा क्रमांक- विहान शेट्टी (४ गुण)
तिसरा क्रमांक- मंश टंक (४ गुण)
१० वर्षाखाली वयोगट – – कै. शांता घोसाळकर स्मृती चषक
पहिला क्रमांक – अंगद पाटील (४ गुण)
दूसरा क्रमांक- मार्तंड गंजणे (४ गुण)
तिसरा क्रमांक- समर्थ गोरे (४ गुण)
९ वर्षाखाली वयोगट – कै. अनिता माळकर स्मृती चषक
पहिला क्रमांक – ओम गणू (४.५ गुण)
दूसरा क्रमांक- अयांश पाटील (४ गुण)
तिसरा क्रमांक- अगस्त्य पथवा (४ गुण)
८ वर्षाखाली वयोगट – कै. एस्तेर पेणकर स्मृती चषक
पहिला क्रमांक – अगस्त्य पथवा (५ गुण)
दूसरा क्रमांक- शौर्य संवादी (४ गुण)
तिसरा क्रमांक- अयांश पाटील (४ गुण)
७ वर्षाखाली वयोगट – कै. रेमंड पेणकर स्मृती चषक
पहिला क्रमांक – राजवीर पाटील (४ गुण)
दूसरा क्रमांक- शिवांशू शर्मा (४ गुण)
तिसरा क्रमांक- राजविर घुमान (४ गुण)