अर्णव जाधव आणि गार्गी राऊत यांची चमकदार कामगिरी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केले सन्मानित
अशोक गायकवाड
खालापूर : वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या अर्णव दिपाली शैलेश जाधव आणि गार्गी सुप्रिया तानाजी राऊत यांनी सुवर्ण, रौप्य, कास्य पदक पटकावून चमकदार कामगिरी केली आहे. याबद्दल कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्र आमदार महेंद्र थोरवे यांनी अंकल किचन रिसॉर्ट खोपोली येथे ट्रॉफी व अभिनंदन पत्र देवून अर्णव जाधव आणि गार्गी राऊत या खेळाडूंना सन्मानित केले.
गोवा, म्हापसा येथे झालेल्या २५ व्या फुनाकोशी वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीप मध्ये खालापूरच्या डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस् ॲकॅडमिच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण, ४ रौप्य, ६ कास्यपदकाची कमाई केली. ७ ते १० नोव्हेंबर रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संस्थेचे मुख्य प्रशिक्षक डॉ. महादेव शिंदे यांनी सांगितले. विविध गटात खालापूरातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. कु.अर्णव शैलेश जाधव १ सुवर्ण, १ कास्य, कुमारी गार्गी राऊत १ सुवर्ण, १ रौप्य, सिया बैलमारे हिने १ सुवर्ण, २ कास्य, साक्षी धारणे १ सुवर्ण, १ रौप्य, अस्मिकुमार जैस्वाल याने १सुवर्ण, १ रौप्य, गार्गी राऊत १सुवर्ण, १ रौप्य, गणेश तोरस्कर १ सुवर्ण, १ रौप्य, अर्णव जाधव १ सुवर्ण, १ कास्य, दित्या पाटील २ कास्य, कौशल बांदेकर याने १ कास्यपदक पटकावले. सर्व खेळाडूंना सेन्सई नागेश बांदेकर, सेन्सई नितीन बोन्दार्डे या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले, संस्थेचे मुख्य प्रशिक्षक डॉ. महादेव शिंदे यांनी सांगितले.
००००
