मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने २४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान ओ. एन. जी. सी., भारतीय आयुर्विमा महामंडळ व इंडियन ऑईल पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, जे. के. सावंत मार्ग, मनमाला मंदिरासमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई – ४०००१६ येथे आयोजित करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी ( ५० वर्षावरील ), महिला वयस्कर एकेरी ( ५० वर्षावरील ) तसेच आंतर कचेरी व आंतर क्लब असे सहा गट या स्पर्धेत खेळविण्यात येणार आहेत. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या खेळाडूंनी आपली नावे आपल्या क्लब मार्फत दिनांक १६ व १७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, माहिम, मुंबई – ४०० ०१६ येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *