माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार
हरिभाऊ लाखे
नाशिक : अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांसाठी अंबड येथून गुरुवार १६ जानेवारी सकाळी ८ वाजता पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. २२ जानेवारी रोजी राज्यपाल यांना भेटून निवेदन देणार आहोत या आंदोलनात शेवटी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.
अंबड व सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 1100 हेक्टर इतकी जमीन सन 1973 ला बळजबरीने संपादित केली. त्यावेळी अनेक आश्वासने शासनाने दिली होती. एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या :
1994 च्या परिपत्रकातील पीएपी धोरणात बदल करण्यात यावा
अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायरान जमीनही विनासंमती एमआयडीसीला देण्यात आली. ती गायरान जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी. एम आय डी सी व नासिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही STP v ETP प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली त्यामुळे शेती पिकत नाही.
सन 1973 ला जमीन संपादित झाल्यानंतर त्यांच्या लेआउट मध्ये 4 ते 5 मीटर चे रस्ते सोडल्याने आज उरलेल्या जमिनीत अंतिम लेआउट करता येत नाही. एमआयडीसीतील अनेक पडीत भूखंडाचे छोटे छोटे तुकडे करून बिल्डर व गुंतवणूकदार यांना वाटप करण्यात येत असल्याने उद्योजकांना भूखंड मिळत नाही.
अंबड चुंचाळे येथे प्रचंड नागरी वस्ती वाढल्याने गेल्या 20 वर्षापासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे. एमआयडीसीत अनेक भूखंडावर बेकायदेशीर पोटभाडेकरू व बेकायदेशीर भूखंडाचा वापर थांबविण्यात यावा. अशा विविध मागण्यांबाबत शासनाने दखल घ्यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाचे स्वरूप
मोर्चेकरी साधारणता 100 ते 125 प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील
सुरुवात दिनांक 16/1/2025 पासून अंबड येथून
1) 16/1/25 मुक्काम 1ला घोटीच्या आसपास
2) 17/1/25 मुक्काम 2रा कसारा खर्डीच्या आसपास
3) 18/1/25 मुक्काम3रा शहापूरच्या आसपास
4) 19/1/25 मुक्काम4था पडघा मानकोळी
5) 20/1/25 मुक्काम5वा मानकोळी कल्याण बायपास
6) 21/1/25 मुक्काम6वा ठाणे च्या आसपास
7) 22/1/25 मुक्काम7वा मुलुंड मुंबई.
००००
