अनिल ठाणेकर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली.
मुख्य प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका व विचार हे माजी खासदार आनंद परांजपे हे मांडतील, भाष्य करतील. घटक पक्षांविषयीची भूमिका, इतर राजकीय भूमिका यांवर पक्षाचे इतर सर्व प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करुनच पक्षाची भूमिका मांडतील. तर आनंद परांजपे हे, सखोल अभ्यास व माहिती घेऊनच, पक्षाची धेय्य धोरणे व भूमिका, प्रसार माध्यमांसमोर मांडतील, वक्तव्य करताना आपल्या पक्षाबद्दल गैरसमज व वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही मुख्य प्रवक्ते म्हणून आनंद परांजपे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.
