कल्याण : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याणच्या वतीने मंगळवारी अन्न क्षेत्रात सालाबादप्रमाणे मकरसंक्रांत निमित्ताने यंदाही संस्था संचालक व मान्यवरांच्या हस्ते गरजू लोकांना धान्यकीट व चिक्की वितरण करण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील आधार वाडी जवळ येथे असलेल्या अन्न क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून दररोज गरजू लोकांना भोजन व दरमहा धान्यकीटचे वितरण करण्यात येत आहे. या संस्थाचे सेवा कार्य मानव सेवा ही प्रभु सेवा ह्या पू. डोंगरे महाराज ह्यांनी दिलेल्या सुत्रांच्या प्रेरणेने होत आहे. यासाठी रामकृष्ण सेवा संस्थाचे संचालक जसु चंदाराणा, विनु तन्ना मेहेनत घेत आहे. याकामी छबिल कारीया, मितुल देसाई, वंश चंदाराणा, सुभाष रायचूरा, राजिव चंदाराणा, भिखू कारीया, विष्णूकुमार चौधरी, अवधूत शेट्टे, रश्मी चंदाराणा, मोनीश चंदाराणा आदी लोकं सहभागी होत आहेत.
