मुंबई : अंजू सिंगच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर स्पॉन्सर्स इलेव्हनचा १३७ धावांनी पराभव करुन भामा सी.सी.ने सलग तिसऱ्या विजयासह ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अंजूने २० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. ज्यामुळे भामाला ४ बाद २१४ असा धावांचा डोंगर रचता आला तोही १७ षटकांमध्ये. स्पॉन्सर्स संघाने मग २ बाद ७७ अशी मजल मारुन पराभव स्विकारला.
यजमान स्पोर्टिंग युनियनने आपल्या शेवटच्या साखळी लढतीमध्ये बोरीवली सी.सी.ला ७ विकेटनी पराभूत केले. प्रतिस्पर्ध्यांना १५ षटकांमध्ये ८ बाद ९२ असे त्यांनी रोखले. मैदानामध्ये एका भागात चिखल असल्याने ही लढत उशिरा सुरु झाली. स्पोर्टिंगने हे लक्ष १२.२ षटकांमध्ये पार केले. त्यांच्या प्रांजळ मळेकरने ३७ चेंडूत ८ चौकाराच्या सहाय्याने नाबाद ५५ धावांची खेळी केली. स्पोर्टिंग युनियनचा हा दुसरा विजय. या गटामध्ये साईनाथ स्पोर्ट्स आणि महाराष्ट्र यंगचा प्रत्येकी एक सामना बाकी असून त्यांनाही उपांत्य फेरी गाठता येऊ शकते.
साईनाथने स्पोर्टिंग युनियनला काल मंगळवारी ८६ धावांनी पराभूत केले होते. त्याआधी बोरीवलीने साईनाथवर १९ धावांनी विजय प्राप्त केला होता. त्यामुळे साईनाथ आणि महाराष्ट्र यंग यांच्यातील विजेत्यासह स्पोर्टिंग युनियन उपांत्य फेरीत प्रवेशकरते होतील.
संक्षिप्त धावफलक
साईनाथ स्पोर्टस् २० षटकांत ७ बाद १६० धावा, ‌(सिम्रन डिमेलो २४, श्रावणी पाटील २५, सेजल विश्वकर्मा २६, गगना मुल्कला २३ धावांत ३ बळी) वि.वि. स्पोर्टिंग युनियन‌ १८.३ षटकात सर्वबाद ७४ (महिमा यादव १४, निधी घरत ५ धावांत ३ बळी, वेदिका पाटील १६ धावांत‌ ३ बळी, श्रावणी पाटील ११ धावांत २ बळी) सामन्यात सर्वोत्तम : निधी घरत
भामा सी.सी.१७ षटकात ४ बाद २१४ (अंजू सिंग १३४, हृदयेशा पटेल ४६, अनन्या बागवे १५ धावांत २ बळी) वि.वि. स्पॉन्सर्स इलेव्हन १७ षटकात २ बाद ७७ धावा (रिया भावसार ३३ नाबाद, अनन्या बागवे २२) सामन्यात सर्वोत्तम : अंजू सिंग
बोरिवली सीसी १५ षटकात ८ बाद ९२ (स्वरा हिरे २९, अनन्य पथारी ११ धावांत ३ बळी, गगना मुल्कला २० धावांत २ बळी) पराभूत विरुध्द स्पोर्टिंग युनियन १२.२ षटकात ३ बाद ९३ धावा (प्रांजळ‌ मळेकर नाबाद ५५ धावा) सामन्यात सर्वोत्तम : प्रांजळ मळेकर
स्पॉन्सर्स इलेव्हन २० षटकांत ७ बाद १०९ धावा (अनन्या बागवे ३८, चित्रा घाडीगावकर २९ धावांत २ बळी) वि.वि. जे. भाटिया स्पोर्टस् क्लब १८.१ षटकांत सर्वबाद ७३ (काव्या दढवे २४, कनिका विजयकार्तिकराज १० धावांत ३ बळी, गरिमा वर्मा ५ धावांत ३ बळी) सामन्यात सर्वोत्तम : गरिमा वर्मा
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *