मनसेचा राज्य सरकारला इशारा

 

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्याची स्वतः ची पेपर लॉटरी बंद करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे लॉटरी सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी दिला आहे.दिव्यांग अंध अपंग लोक,वृध्द,बेरोजगार तरुण हे महाराष्ट्र लाॅटरीची तिकिटे विकून पोट भरत आहेत.त्यांची उपासमार होऊ देऊ नका.असेही गणेश कदम यांनी म्हटले आहे.
दिव्यांग आणि बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा व जुगारावर नियंत्रण राहाव यासाठी महाराष्ट्र सरकारने १९६९ ला स्वतः ची पेपर लॉटरी सुरु केली. या लॉटरी विक्रीचा व्यवसाय करून अंध,अपंग, वृद्ध व्यक्ती याच बरोबर बेरोजगार तरुण आपला उदरनिर्वाह करतात, या लॉटरी वर आज हजारो लोकांची रोजी रोटी अवलंबून आहे. अशी महाराष्ट्र राज्याची विश्वसनीय लॉटरी बंद करण्याचा घाट महाराष्ट्र सरकार करीत आहे असा आरोप गणेश कदम यांनी केला आहे.
राज्य सरकारने लाॅटरी तिकिटे विकण्याची आपली जुनी पुराणी विक्री व्यवस्था बदलून आजच्या डिजिटल युगात अत्याधुनिक विक्री प्रणाली राबवून महाराष्ट्र राज्य लॉटरी तिकिटांचा खप कसा वाढेल याचा विचार या सरकारने केला पाहिजे असेही गणेश कदम यांनी म्हटले आहे.
क्षेत्रफळाने व लोकसंख्येने कमी असलेल्या केरळ राज्याचा लॉटरी बंपरचे पाहिले बक्षीस २५ करोड व महाराष्ट्र राज्याचे दिवाळी किंवा गणपती बंपरचे तिकिटाचे पहिले बक्षीस फार फार तर एक करोड.ही एव्हढी मोठी तफावत ठेवून सरकार महाराष्ट्र राज्य लॉटरीचा गळा घोटून अन्य राज्यातील लॉटरी विक्रीला रान मोकळे करण्याचा डाव हाणून पाडेल असा इशारा मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी दिला आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *