-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन

ठाणे: राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत दिली.
राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात.
त्यानुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 (सन 2015 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.5 च्या कलम 3 (1) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात येतात.
नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत काल मर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिल प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये (परिशिष्ट सोबत जोडले आहे) नमूद केल्याप्रमाणे या सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *