मुंबई : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) 34 व्या राज्यव्यापी अधिवेशनात श्री सुरेश ईश्वर पोटे यांना राजश्री शाहू महाराज पुरस्कार उत्कृष्ट ज्येष्ठ पुरुष कार्यकर्ता म्हणून सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी फेस्कॉम अध्यक्ष श्री अण्णासाहेब टेकाळे, माजी अध्यक्ष अरुण रोडे व मान्यवर यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
समाजभूषण सुरेश पोटे फेस्कॉम मुंबई विभाग अध्यक्ष आहेत तसेच ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र डायरेक्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आज पर्यंत अनेक मान सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत.
०००००
