मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान कुर्ला शाखा आयोजित १४ वर्षाखालील शालेय मुलांची कबड्डी स्पर्धा १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता गांधी मैदानावर होणार आहे. स्पर्धेत महिला मंडळ माध्यमिक विद्यालय कुर्ला, सेंट जोसेफ हायस्कूल कुर्ला, कुमुद विद्यामंदिर इंग्रजी माध्यम गोवंडी, अँटोनिया डिसूजा हायस्कूल भायखळा, विनोबा भावे नगर म्युनिसिपल स्कूल कुर्ला, नेहरू नगर म्युनिसिपल स्कूल कुर्ला, डॅफोडील हायस्कूल कुर्ला आणि श्री हशु अडवाणी मेमोरियल स्कूल गोवंडी या आठ शाळांचा सहभाग आहे.
‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटात साखळी व बाद फेरीचे सामने होणार आहेत. . स्पर्धेसाठी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विनायक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे ..या स्पर्धेसाठी बंडू कांबळे राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक अविनाश महाडीक क्रीडा शिक्षक ,ॲड. प्रणिल गाढवे, प्रतिक गाढवे ,गौरी शंकर क्रीडा मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ,कुर्ला यांची देखील मदत मिळाली आहे.