ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालात जिल्ह्यातील प्रथमच बायो मेडिकल घन कचरा स्वच्छ आणि विल्हेवाट मशीन बसवण्यात आले असून बुधवारी राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले हे मशीन केतकरांच्या खासदार निधीतून बसवण्यात आले आहे ह्या मशीनमुळे सुमारे रोज ५ ते १० किलो बायो मेडिकल कचरा स्वच्छ होणार असून पर्यावरणाचे हानी कमी होण्यास मदत होणार आहे पुढे सर्व शासकीय रुग्णालयात बसवण्यात येणार असून यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार , डॉ.अर्चना पवार, डॉ. धीरज महांगडे, राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.