ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तसेच राम गणेश गडकरी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, अनघा कदम, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.