मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आंतर सहकारी बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील नामवंत १५६ खेळाडू सहभागी झाले आहेत. विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित रोख पुरस्कारासह विजेतेपदाचा पुरस्कार पटकाविण्यासाठी जनकल्याण सहकारी बँक, मुंबै बँक, मराठा सहकारी बँक, महाराष्ट्र मंत्रालय बँक, अपना सहकारी बँक, नेव्हल डॉकयार्ड बँक, चेंबूर नागरिक सहकारी बँक, विमा कामगार को-ऑप.बँक, एनकेजीएसबी, कोंकण मर्कन्टाईल बँक, एसटी को-ऑप. बँक, म्युनिसिपल को-ऑप. बँक, सिटी को-ऑप. बँक, मालाड सहकारी बँक, कुर्ला नागरिक सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ग्रेटर बँक, इन्कमटॅक्स बँक आदी सहकारी बँकांचे खेळाडू दादर-पश्चिम येथे निकराच्या लढती देतील.
कॅरम स्पर्धेमधील मानांकन पुरुष एकेरी गटात अपना बँकेचा गीतेश कोरगावकर, म्युनिसिपल बँकेचा दानिश काझी, अपना बँकेचा महादेव जावीर यांना; पुरुष दुहेरी गटात सिटी बँकेचे शिशिर खडपे व स्वप्नील जाधव, चेंबूर बँकेचे सुशांत सावंत व प्रफुल जाधव, जनकल्याण बँकेचे भार्गव धारगळकर व देवेंद्र पिसाळ, कोकण बँकेचे सोहेल मुकादम व मुबीन शेख यांना आणि महिला एकेरी गटात म्युनिसिपल बँकेच्या संध्या बापेरकर व उषा कांबळे यांना; महिला दुहेरी गटात अपना बँकेच्या गौरी कोरगावकर व साक्षी सरफरे, म्युनिसिपल बँकेच्या उषा कांबळे व संध्या बापेरकर यांना लाभले आहे. गतविजेता म्युनिसिपल बँकेचा मानस सावंत, एनकेजीएसंबीचा विनोद मोरे, म्युनिसिपल बँकेचा दीप शिनिमकर आदी बुध्दिबळ स्पर्धेमधील मानांकित खेळाडू आहेत. स्पर्धेचे उद्घाटन युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, विमा कामगार को-ऑप. बँकेचे अध्यक्ष प्रशांत सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, जनार्दन मोरे आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.
