कल्याण : कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ज्वेलर्स असोसिएशन व व्यापारी यांची बैठककल्याण पूर्वेतील प्रसाद हॅाटेल येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सुरक्षितेबाबत ११२ नंबर बाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. तसेच कॅमेरे देशासाठी, एक कॅमेरा समाजासाठी या संकल्पनेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना देऊन डिजिटल अरेस्ट सायबर क्राईम, हॅालमार्क फसवणूक या बाबत मार्गदर्शन केले. याठिकाणी 30 ते 35 ज्वेलर्स दुकानदार,मालक व्यापारी उपस्थित होते.