15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे :25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार दि.25 जानेवारी 2025 हा कामकाजाचा दिवस नसल्याने दि.24 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये मतदान शपथ (मराठी, इंग्रजी व हिंदी मधील शपथेचा नमुना सोबत जोडला आहे) घेण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे असतील तर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बित्तंबातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट, ठाणेच्या अध्यक्ष श्रीमती एम.एस. कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे हे तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा को.ऑप.हौ.सो. फेडरेशनचे सिताराम राणे, अपंग विकास महासंघ, कल्याणचे अध्यक्ष अशोक भोईर, किन्नर अस्मिता नीता केणे व ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन हे निवडणूक दूत म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप व उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमास दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी उर्मिला पाटील, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी इब्राहिम चौधरी, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल इनामदार आणि 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी केले आहे.