अशोक गायकवाड
रायगड : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार, दि.२६ जानेवारी २०२५ रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी ९.१५ वा.संपन्न होणार आहे.
ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाख परिधान करण्यात यावा. नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
