कल्याण : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित -गौरीपाडा, कल्याण .प व स्फूर्ती फाउंडेशन संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५ वा. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कौस्तुभ बिल्डिंगच्या बाजूला, श्रीराम कॉलनीच्या मागे, मिलिंदनगर येथे भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबीर मध्ये नेत्र तपासणी, चॅरिटेबल दरात चष्मे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, हृदय विकार उपचार,मोफत बॉल्स पेसमेकर सर्जरी, कॅन्सर सर्जरी, अॅजोप्लेस्टी, डायलेसिस, हाडांची सर्जरी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन सर्जरी, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी तपासणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करून एखादा व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक रक्तदान नक्की करा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व स्फूर्ती फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.