मुंबई : लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओ. एन. जी. सी पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे उदघाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहाय्यक सचिव दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, सहसचिव केतन चिखले, लोकमान्य मंडळाचे नवीन जोशी, मनोहर गोडसे, श्रीकांत गोडसे, सुहास बेडेकर, अनिरुद्ध रहाळकर, राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत उपस्थित होते. आंतर संस्था व आंतर क्लब सांघिक गटाने स्पर्धेला सुरुवात झाली. सांघिक गटाचे निकाल पुढीलप्रमाणे.
आंतर संस्था सांघिक गट पहिल्या साखळी सामन्यातील निकाल पुढील प्रमाणे.
माझगाव डॉक ब संघ वि वि पी.डी.ए. सेंट्रल ३-०
मुंबई महानगरपालिका ब संघ वि वि भारतीय आयुर्विमा महामंडळ २-१
आंतर क्लब सांघिक गट पहिल्या साखळी सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे.
शिवतारा अ संघ वि वि विजय कॅरम क्लब ३-०
ए के फाउंडेशन वि वि शिवतारा ब संघ २-१
डी के सी सी ब संघ वि वि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ २-१
डी की सी अ संघ वि वि ए. के. एफ ब संघ २-१