भाजपा ठाणे शहर आणि सन्मान फाऊंडेशन यांच्यावतीने भव्य सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
ठाणे : भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व सन्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9. 30 वाजता कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, सिद्धेश्वर तलावाजवळ, चंदनवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, ना. आशिष शेलार, मा. केंद्रीयमंत्री कपिल पाटील, खासदार धैर्यशील पाटील, वनमंत्री गणेश नाईक, आमदार अॅड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, पेण-सुधागड आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रविण दरेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार विक्रांत पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ, आमदार शिवाजी पाटील, आमदार रविंद्र फाटक, भाजपा महिला सरचिटणीस माधवी नाईक, मराठा समाज सुधागड तालुका अध्यक्ष धनंजय सोजकर, शिवसेना नेते रायगड जिल्हा प्रकाश देसाई, महराराष्ट्र प्रदेश सदस्य भाजपा राजेश मापारा, तसेच पाली नगरपरिषदेतील नगरसेवक व सुधागड तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच यांच्यासह भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष तथा मा. नगरसेवक कृष्णा पाटील, भाजपा ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, मिलिंद पाटणकर, मृणाल पेंडसे, मुकेश मोकाशी, अशोक राऊळ, अर्चना मणेरा, सचिन पाटील, समिरा भारती यांच्यासह ठाणे, रायगडातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी ठाणे, रायगड मुंबई, पुणे येथील सुधागडवासी तसेच सर्व ठाणेकरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे सल्लागार तथा सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश सागळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कबड्डी खेळ हा ठाणे जिल्ह्यात अत्यंत लोकप्रिय असा मैदानी खेळ आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका रहिवाशांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर व आमदार अॅड. निरंजन डावखरे तेसच जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश सागळे यांच्यावतीने आयोजित सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेसाठी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनीही उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजक रमेश सागळे यांनी केले आहे.
सुधागड तालुक्यातील 26 संघाचा समावेश असलेल्या स्पर्धेत राज्यस्तरावरील क्रीडा पंच देखरेख करणार असून या कार्यक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व संयोजक, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, राकेश थोरवे, अविकांत साळुंके, जयगणेश दळवी, सुधीर नेमाणे, अजित सागळे, धनंजय खाडे, सुनिल तिडके, प्रविण बामणे, ज्ञानेश्वर यादव, अजित सागळे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे सुधागड तालुक्यातील ठाणे शहरात वास्तव्यास असणार्या उद्योजकांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बल्लाळेश्वर म्युझिकल ग्रुप आणि रिदम म्युझिक अॅकेडमीच्यावतीेने मराठी वाद्यवृंदाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायक नथुराम शिंदे, समीर दंत, प्रतिक्षा भणगे (शिलकर), ढोलकीपटु तेजस मोरे व बालशाहीर – गायक सौजस मोरे हे कलाकार बहारदार संगिताने रसिकांची करमणूक करतील.