स्फूर्ती फाउंडेशनच्या मागणीला यश

कल्याण :  गौरीपाडा परिसरातील नागरीकांच्या तक्रारीनुसार साई सृष्टी सोसायटी व  प्रकृति आंगन सोसायटीतील प्रवेशद्वार समोर पथदिवे नसल्याने रात्री अपरात्री प्रवास करताना नागरीक,महिला , जेष्ठ नागरिक यांना समस्यांचा सामना करावा लागत होता, पथदिव्यांसाठी मागील काही वर्षांपासून स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून  कल्याण डोंबिवली महानगरपालिका विद्युत विभागाकडे  पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत होते होता.  निधी अभावी मंजूरी मिळत नव्हती यासाठी स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा‌ करण्यात आला. त्याला नुकतेच यश आले असून गौरीपाडा परिसरातील साई सृष्टी सोसायटी व प्रकृति आंगन सोसायटीतील पथदिव्यांसाठी पथदिवे (स्ट्रिट लाईट)बसवुन २६ जानेवारी  रोजी  सुरू करण्यात आले.

यानिमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच विद्युत विभाग व कर्मचारी यांचे आभार स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी मानले तर या परिसरातील नागरिकांनी  याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *