पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
ठाणे : रविवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.
या यशात माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी कर्मचारी तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्याचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन, सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.याचबरोबर माझ्या कुटुंबियांची मला आजपर्यंत मिळालेली “खंबीर साथ, त्यांचा त्याग” आणि आपल्या सर्वांचा आशिर्वाद, शुभेच्छा मी कधीही विसरू शकत नाही.मी आपल्या सर्वांचाच कायम ऋणी आहे. असे मत दैनिक बित्तंबातमी प्रतिनिधी अशोक गायकवाड यांच्या बरोबर बोलताना सानप यांनी व्यक्त केले.
