एन एस फिटझोन जिम आयोजित अंतर्गत क्रिकेट स्पर्धा
नौपाडा विभागातील राम मारुती मार्गावरील सुप्रसिद्ध एन एस फिटझोन जिम आयोजित अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या द हंटर संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. संघाच्या अंतिम विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या वैदूल कामठेला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचे पारितोषिक नितेश गालाला देण्यात आले.तर प्रशिक रोकडे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागातील उप सचिव चंद्रकांत कृष्णा मोरे यांनी नारळ फोडून या स्पर्धेचे रितसर उद्घाटन केले. एनएस फिटझोन जिमचे संचालक मंगेश सावर्डेकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.