महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप

ठाणे : नुकत्याच ठाणे येथे झालेल्या Yonex Sunrise महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेत मुंबईच्या  मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांनी 65 वर्षे वर्षावरील दुहेरीचे राज्य विजेतेपद पटकाविले.  त्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी मुंबईच्या कुमार हिंदुजा व रमण Venkatkrshanan यांचा 19-21, 21-19 व 21-17  अशा अटीतटीच्या लढतीत पराभव केला़.  या स्पर्धा ठाणे शहर व ठाणे जिल्हा यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली  घेण्यात आल्या.   या प्रसंगी  मिलिंद पूर्णपात्रे     यांनी गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने उत्तम कामगिरी केल्या बद्दल तसेच प्रशिक्षक व संघटक म्हणुन जी कामगिरी करून बॅडमिंटन चा प्रसार करण्यास हातभर लावला  त्याबद्दल श्री  श्रीकांत वाड,  महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन चे सेक्रेटरी यांच्या हस्ते  मिलिंद पूर्णपात्रे यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *