सिमेंट-काँक्रिटचे जंगल असलेल्या मिरा – भाईंदरमध्ये सांस्कृतिक कलामहोत्सवाची पर्वणी
अरविंद जोशी
मिरा-भाईंदर : या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षक पहाटेच्या दवात तसेच अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर च्या सुरात नाहून निघाले. या वेळी गायक मंदार आपटे यांनी अभंग आणि गाणी म्हटली. काल पहाटेच्या कार्यक्रमात पंडित रितेश आणि रजनीश मिश्रा यांनासुद्धा रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शुक्रवारी संध्याकाळी कार्यक्रमाची सुरुवात पाशर्वगायक अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यानी झाली. शनिवारी संध्याकाळी पार्शवगायिका साधना सरगम यांचा रंगतदार गाण्यांचा कार्यक्रम पर पडला. रविवारी संध्याकाळी गुलाबी साडी फेम संजू राठोड यांचा मंत्र मुग्ध करणारा कार्यक्रम पार पडला.
तसेच येथे स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी मुद्रा रंगमंच देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी महोत्सवात अनेक शालेय विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. प्रदर्शने, क्रीडा, कलादालन, पाळीव प्राण्यांची धाव, रांगोळी प्रदर्शन, मुलांसाठी साहसी खेळ, फूड कोर्ट आणि स्थानिक कलाकारांचे कला प्रदर्शनही येथे आयोजित केले आहे.
या महोत्सवादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वर्णन करणारी छायाचित्र दालन आणि राजा रवि वर्मा यांच्या अमूल्य चित्रांचे प्रदर्शन लोकांना उपलब्ध करून दिले आहे. चार दिवसांच्या या महोत्सवात एक लाखाहून अधिक लोक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोमवारी संध्याकाळी मिका सिंग यांच्या संगीत रजनीने या प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित महोत्सवाची सांगता होणार आहे.
मीरा भाईंदर शहरातील नागरिकांची सांस्कृतिक गरज पूर्ण करण्यासाठी हे फेस्टिवल मोठे काम करीत आहे. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या, विविध कलांचा अविष्कार असणाऱ्या या फेस्टिवलला मिरा भाईंदरकर नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत , दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.