काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केलं मत

पुणे : महाराष्ट्रात नुकत्याच बीड, परभणी, बदलापूर, ठाणे येथे घडलेल्या घटना या मानवतेस लाज आणणाऱ्या व देशात राज्याची बदनामी करणाऱ्या आहेत, तर दुसरीकडे संताची शिकवणुक सत्य, नैतिकता, मानवता व न्यायाची चाड असणारी व निर्भयतेची असल्याने.. सद्यः परीस्थितीत राज्यातील समाज जीवनात

संत संस्कारांचे व नैतिकतेचे अधिष्ठान अधिक बळकट करणे काळाची गरज असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.

अम्युनेशन फॅक्टरी व सलग्न संस्था खडकी यांच्यावतीने हभप  ‘किर्तन महोत्सवांचे’ आयोजन करण्यात आले होते. याच्या समारोप प्रसंगी गोपाळ दादा तिवारी यांनी विचार मांडले. कीर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, किर्तन महोत्सवाचे संयोजक व अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, रमेश भिडे पाटील, विकास नाना दांगट, जेष्ठ पत्रकार दिपक जाधव, भोलाशेठ वांजळे इ यावेळी उपस्थित होते

यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, वरील अमानवी घटनांमुळे महाराष्ट्र देशभर बदनाम होत असून

शिव – छत्रपतींच्या महाराष्ट्रात संतांचे संस्कार लोप पावत चालले काय(?) असा प्रश्न विचारून ते म्हणाले की,

“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।

भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।”

असे संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत. राष्ट्राला आदर्श ठरणाऱ्या संतांच्या भूमीत नीतिमत्तेला पायदळी तुडवून विकृती डोके वर काढत असेल तर वारकरी संप्रदायाने सज्जनांचा धाक वाढण्यासाठी, संतांची चळवळ तीव्र करणे व नैतिक अधिष्ठान प्रस्तापित करणे गरजेचे आहे असे काँग्रेस नेते, गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

हभप संतोष महाराज पायगुडे यांनी समारोपाच्या किर्तनात सांगितले की, ‘भारतभूषण म्हणावे असे आपले पुणे आहे. पुण्यात पहिला अभंग लिहिला गेला, ज्ञानेश्वरी पुण्यात लिहिली गेली इतकेच नव्हे तर देशातील पहिला दारूगोळा कारखाना पुण्यात उभा राहिला, अशी पुण्याची कीर्ती आहे.

या प्रसंगी.. सामुदायिक अभंगां बरोबरच.. “जहां सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा’ ही देश भक्तीपर सामुहीक गीत देखील गायले गेले..!

पैलवान माणिक ढोले, संतोष देशमुख, दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी कीर्तन महोत्सवाला भेट दिली.

अमिनेशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक संजय हजारी, दीपक महाजन, विजय कुटील, मनमोहन खंदारे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *