श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघ विजेता

ठाणे ः भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक रविवारी कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, चंदनवाडी येथे संपन्न झाली. दिवसभरात 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना चिवे विरुद्ध झाप असा रंगला. अतितटीच्या लढतीत चिवे – झाप अंतिम गुणफलक नोंदवून चिवे – श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ या संघाने 12-11 असा विजय मिळवला. विजेता संघाला प्रथम पारितोषिक सन्मान चिन्ह व रोख 21000/- रुपये देण्यात आले. द्वितिय पारितोषिक झाप – श्री नाथभैरव क्रीडा मंडळाने पटकावत 15 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह जिंकले. तृतीय क्रमांक पारितोषिक ओम काळभैरव आपटवणे संघ ठरला. त्यांना रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. श्री भैरवनाथ नागशेत क्रीडा मंडळ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरला. त्यांनाही रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. विजेत्यांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश मापारा, पेण सुधागड राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, शिवसेना नेते प्रकाश देसाई, परिवहन सदस्य विकास पाटील, अनिल भोईर, गणपत डिगे, प्रकाश शिलकर, आयोजक रमेश सागळे, भाजपा ठाणे शहर महिला चिटणीस रेवती सागळे, ज्ञानेश्वर यादव, यांच्यासाह सुधागड वासी मोठया संख्येने उपस्थित होते.

वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट पकड झाप संघाचा कल्पेश देशमुख, उत्कृष्ट चढाई ओम काळभैरव आपटवणे संघाचा समाधान मोरे, पबिलक हिरो श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत संघाचा राज बेलोसे, सर्वोत्कृष्ट खेळाडू चिवे संघाचा अमर ठाकूर ठरला. शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक श्री. भैरवनाथ जोगेश्वरी आतोणे

सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय केळकर, आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उद्योजक अच्युत दामले, पालीचे नगरसेवक पराग मेहता, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, माजी अध्यक्ष गणपत सितापराव, संचालक प्रा. बळीराम निंबाळकर सर, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे सल्लागार चंद्रकांत बेलोसे, उद्योजक गणेश दंत, उद्योजक चारुदत्त सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष उतेकर, ज्येष्ठ नगरसेवक संदीप लेले, ज्येष्ठ संपादक कैलाश म्हापदी, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस सचिन पाटील, उद्योेजक ओमकार साजेकर,  कल्याण-डोंबिवली सुधागड तालुका अध्यक्ष यशवंत कदम, चिवे गावचे सरपंच रोहिदास साजेकर, उद्योजक प्रवीण खाडे, उद्योजक स्वप्नील पायगुडे, टेंभीनाका शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उद्योजक संतोष तोडकर, धीरज साजेकर, सखाराम आंबेकर, सुर्यकांत साळुंखे, भाजपा ठाणे शहर सचिव संतोष साळुंखे, भाजपा ठाणे शहर चिटणीस माधुरीताई मेटांगे, रंजना खाडे, कोकण पदवीधर संयोजक सचिन मोरे, शिवाजी दळवी, शिवसेना उपविभागप्रमुख सिद्धु यादव, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोईर, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, भार्जे गावचे सुभाष मुंडे, सुजित बारस्कर, भाजपा ओबीसी सेलचे कृष्णा भुजबळ, राजेश कवे, पी. आय. संतोष धाडवे, शिवाजी दळवी, निलेश महाडीक, महेश सितापराव, उद्योजक संजय सागळे, नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्यासह ठाणे, रायगड, मुंबई, पुणे जिल्ह्यातून सुधागडवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक रमेश सागळे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सुनिल तिडके, राकेश थोरवे, अविकांत साळुंके, जयगणेश दळवी, धनंजय खाडे, प्रविण बामणे, ज्ञानेश्वर यादव, अजित सागळे, सुधीर नेमाणे, सखाराम चव्हाण, रविंद्र चव्हाण, सुहास यादव, दत्ता यादव, गजानन केदारी, विजय जाधव, अजय जाधव, चंद्रकांत बेलोसे, दत्ता सागळे, श्याम बगडे, जनार्दन घोंगे, सुरेश शिंदे, अनिल सागळे, दिनेश बुरुमकर, गजानन जंगम, हरिश्चंद्र मालुसरे, मोहन भोईर, राम भोईर भगवान तेलेगे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. केतन म्हस्के व अलंकार मनवी यांच्या उत्कृष्ट सुत्रसंचलनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. दिवसभरात उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बल्लाळेश्वर म्युझिकल ग्रुप आणि रिदम म्युझिक अ‍ॅकेडमीच्यावतीेने मराठी वाद्यवृंदाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायक नथुराम शिंदे, किशोर शिलकर, समीर दंत, नुतन सावंत, प्रतिक्षा भणगे (शिलकर), ढोलकीपटु तेजस मोरे व बालशाहीर – गायक सौजस मोरे यांनी सुमधूर गायनाने रसिकांची मने जिंकली. गायक किशोर शिलकर यांनी आयोजक रमेश सागळे यांच्या जीवनावर वैयक्तिक तयार केलेले गीत सादर केले व सौजश मोरे यांनी कबड्डडीसाठी तयार केलेले गाणे सादर केले. शेवटी आयोजक रमेश साबळे यांनी उपस्थितीत मान्यवर, सुधागड तालुका रहिवासी, ठाणेकर, खेळाडु, पंच आणि पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *