ठाणे : माँ शिक्षण संस्था समूह आयोजित 22 व्या ठाणे शहर आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धांमध्ये 37 शाळांनी सहभाग घेतला.
ठाणे शहर चॅम्पियनशिप 2024-25 विजेते पुढीलप्रमाणे – मुली – होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, ठाणे; मुले – ठाणे पोलीस स्कुल, ठाणे ; समूह – ठाणे पोलीस स्कुल
वैयक्तिक पारितोषिके –
6 वर्षाखालील मुले – स्पर्श कांबळे (वसंत विहार शाळा);
6 वर्षाखालील मुली – निर्वी कुलकर्णी (वसंत विहार शाळा);
8 वर्षांखालील मुले- जिहांश पाटील (अंबर इंटरनॅशनल स्कूल);
8 वर्षाखालील मुली- निष्का मनुधने (मती सुनीतीदेवी सिंघानिया शाळा);
10 वर्षाखालील मुले- जयदीप खैरनार (ठाणे पोलीस स्कुल);
10 वर्षाखालील मुली- पिरल बिरवटकर (वसंत विहार शाळा);
12 वर्षाखालील मुले- अभिराज वाळंज ( मावळी मंडळ शाळा);
12 वर्षांखालील मुली- इरा जाधव (मती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा);
14 वर्षाखालील मुले- अनिरुद्ध नंभोदारी (मती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा);
14 वर्षाखालील मुली- रिसा फर्नांडिस (मती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल);
16 वर्षाखालील मुले- धैर्य सूर्यराव (मती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा);
16 वर्षाखालील मुली- रिद्धी माने (होली क्रॉस कन्व्हर्ट हायस्कूल)