विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित किशोर गट (४ फुट ११ इंच) व व्यावसायिक पुरुष – महिला गटाच्या खो-खो स्पर्धा लाल मैदान परळ येथे पार पडली. व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेचा (८-८-९-६) १७-१४ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्य रेल्वेतर्फे दिलीप खांडवीने १:१०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. अवधूत पाटीलने १:३०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. मिलिंद चावरेकर व रोहन शिंगाडेने प्रत्येकी १:००, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात प्रत्येकी ४ गडी बाद केले. पश्चिम रेल्वेतर्फे सम्यक जाधवने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ५ गडी बाद केले. वृषभ वाघने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. दिपक माधवने २:१०, १:३० मिनिटे संरक्षण केले.
व्यावसायिक महिला गट:
व्यावसायिक महिला गटाच्या अंतिम सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महावितरण कंपनी संघाचा (६-५-४-६) ११-१० असा १ गुण व १:१० मिनिटे राखुन पराभव केला. रचनातर्फे पुजा फरगडेने २:००, २:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. श्वेता जाधवने २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. सेजल यादवने ३:२०, १:४० मिनिटे संरक्षण केले. महावितरण तर्फे दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही.
४ फुट ११ इंच किशोर गट:
४ फुट ११ इंच किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा (३-१-१-२) ४-३ असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. सरस्वतीतर्फे मेहक आदवडेने नाबाद ६:००, नाबाद ३:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. वरुण गुप्ताने २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. शिवम झाने १:००, १:०० मिनिटे संरक्षण केले. विद्यार्थीतर्फे अपसर शेखने ३:२० मिनिटे संरक्षण केले. पवन गुरवने १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. ओमकार जाधवने २:३० मिनिटे संरक्षण केले.
तृतीय क्रमांकाचे सामने:
व्यावसायिक महिला गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र पोस्टाने मुंबई पोलीस संघाचा (५-३-४-५) ९-८ असा १ गुणांनी पराभव केला तर व्यावसायिक पुरुष गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महाराष्ट्र पोस्टने संघाचा (९-७-३-४) १२-११ असा १ गुण व ३:१० मिनिटे राखून पराभव केला.
४ फुट ११ इंच किशोर गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१०-२-२) १०-४ असा १ डाव व ६ गुणांनी पराभव केला.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
४ फुट ११ इंच किशोर गट
आक्रमक – पवन गुरव (विदयार्थी)
संरक्षक – अधिराज गुरव (ओम साईश्वर)
अष्टपैलू – महेक आदवडे – (सरस्वती)
व्यावसायिक महिला गट
आक्रमक – काजल शेख (रचना)
संरक्षण – सेजल. यादव (रचना)
अष्टपैलू – कल्याणी कंक (महावितरण)
व्यावसायिक पुरुष गट
आक्रमक – सम्यक जाधव (पश्चिम रेल्वे)
संरक्षक – अवधूत पाटील (मध्य रेल्वे)
अष्टपैलू – दिलीप खांडवी (मध्य रेल्वे)