मुंबई : वडाळा येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या रुग्णालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी. जया धिरवाणी, नर्सिंग सिस्टर इन्चार्ज अश्विनी सकपाळ, नर्सिंग सिस्टर. पूजा चव्हाण आणि स्नेहा माळी यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने २८ जानेवारीला रुग्णालयाच्या गार्डन मधील लॉनवर ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. सेवानिवृत्त चारही कर्मचाऱ्यांचा युनियनच्या वतीने तसेच इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
या प्रसंगी चारही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीतील कार्याचा गुणगौरव ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस के शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी विद्याधर राणे, प्रभारी मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. विराज पुरोहित, डॉ. ज्योती चौधरी, डॉ. संदीप बिरारीस, डॉ. सुजाता मोकल, सुलोचना शिंदे इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन केला. सत्काराला जया धिरवाणी, पूजा चव्हाण, मनीषा सकपाळ व स्नेहा माळी यांनी उत्तर दिले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, उपाध्यक्ष शीला भगत, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मीर निसार युनूस सेच चिकित्सा विभागाच्या वतीने , वरिष्ठ उपमुख्य चिकित्सा अधिकारी, मेट्रन मेघा सोबाळकर, डॉ. प्रणीला पुरोहित, असिस्टंट मॅट्रेन सौ बांदेकर, मुंबई पोर्ट प्राधिकरण हॉस्पीटल मधील सर्व अधिकारी व कर्मचारी बंधू व भगिनी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तसेच अल्फाकॉम हाऊस कीपिंग सर्विसेस लिमिटेड मधील सर्व कर्मचारी प्रामुख्याने विशेष उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची सुत्र संचालनाची जबाबदारी नर्सिंग सिस्टर्स निशा बोरगांवकर, शीला भगत व योगिनी दुराफे यांनी आपल्या रसाळ आणि मधूर वाणीने करून संपूर्ण कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्याची जबाबदारी सांभाळली. गार्डनमधील लॉनवर इव्हेंट मॅनेजमेंट करणारे स्नेहा माळी यांचे चिरंजीव स्मित माळी यांनी सत्कार सोहळ्याची व्यवस्था अतिशय सुंदर केली होती. त्याबद्दल त्यांचा प्रभारी मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. विराज पुरोहित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.