द यंग कॉम्रेड्स शील्ड स्पर्धेत पारसी जिमखान्याविरुद्ध घेतल्या 7 विकेट
मुंबई: द यंग कॉम्रेड्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत युनायडेट क्रिकेटर्स संघाला पारसी जिमखान्याविरुद्ध 81 धावांनी पराभूत व्हावे लागले तरी मध्यमगती स्विंग गोलंदाज आदित्य राणेने 7 विकेट घेत सर्वांची मने जिंकली.
जय जैनच्या (97 चेंडूंत 118 धावा) शानदार शतकामुळे पारसी जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. सचिन यादवने 46 चेंडूत 50 धावा करताना इशान मुलचंदानीने 46 चेंडूत 35 धावांचे योगदान देत त्याला चांगली साथ दिली. आदित्य राणेने 22.3 षटकात 87 धावांत 7 विकेट्स घेत छाप पाडली.
प्रतिस्पर्ध्यांचे मोठे आव्हान युनायटेड क्रिकेटर्सला पेलवले नाही. ओंकार रहाटेने 50, सुचित देवलीने 51 तसेच आदित्य सुळेने 32 धावा करताना थोडा प्रतिकार केला. आदित्य राणेनेही 28 चेंडूंत झटपट 30 धावा जोडताना फलंदाजीतही छाप पाडली. मात्र, अन्य सहकार्यांनी निराश केल्याने पराभव पाहावा लागला. सागर छाब्रियाने 3 तसेच नूतन गोयलने 4 महत्त्वपूर्ण विकेट घेत मोठा विजय सुकर केला.
