मिरा – भाईंदर येथील नवघर पोलिसांच्या धडक कारवाईत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. नवघर पोलीसांची गस्त सुरु असताना हे सहा आरोपी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. यांच्या कडच्या तीन मोठ्या बॅगेत तपासणी केली असता त्यात सेहचाळीस किलो गांजा सापडला. या गांजाची बाजारातील किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये आहे.
या आरोपीमध्ये दोन जण गुजरातचे असून चोघे ओडिसाचे असल्याचे कळले. या सगळ्यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेतल्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. हे अट्टल गुन्हेगार आहेत का? हा गांजा ते कोणाला देणार होते ? हा गांजा त्यांनी कुठून आणला? याबद्दलची चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. पोलिसांची टीम त्यांच्या राज्यात जाऊन अधिक चौकशी करेल असं ते पुढे म्हणाले.
आजच्या तरुणांना तसेच या पिढीला अशा व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी अशीच मोहीम राबवावी अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करत आहेत.
