ठाणे : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या ‘युवातरंग’ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन दिले. या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना होती ‘भारतीय ज्ञान परंपरोत्सव,’ ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, विज्ञान आणि परंपरांचा अभूतपूर्व वेध घेतला. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ. श्रद्धा मोरे, प्राचार्य संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेतील ज्ञानाचा वारसा आणि त्याचे आधुनिक जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. `युवातरंग’ स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे मत अध्यक्ष सचिन मोरे यांनी मांडले. ‘युवातरंग’ अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात नृत्य, गायन, वक्तृत्व, पोस्टर तयार करणे, प्रश्नमंजूषा यांसारख्या एकूण सोळा स्पर्धांचा समावेश होता. यातील सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यप्रकारांद्वारे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला विद्यार्थ्यांनी वंदन केले. याशिवाय पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण, विज्ञान, आणि भारतीय परंपरांवर आधारित उत्तम कलाकृती सादर केल्या. सलग तीन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात पार पडला. या वर्षीचा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डोंबिवलीचे प्रगती महाविद्यालय कर्मवीर चषकाचे मानकरी ठरले. त्यांना कर्मवीर चषक व रोख रक्कम रुपये ११,१११/- देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांतील इतर विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास पाहुणे म्हणून महादेव जगताप, संस्थेच्या विश्वस्त संगीता बी. मोरे, सौ. अश्विनी सुर्वे, सुधाकर शिंदे, अशोक पालांडे, विकास घांग्रेकर, संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक सौ. शिवांगी भोसले, स्नेहा मेस्त्री, युगंधरा पाटील, व महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रशांत काळुंद्रेकर, समीर दळवी, ओमकार चिक्षे, सचिन गजमल, सतीश आगाशे, धनश्री राक्षे, प्रा. गुलाबराव काटे, प्रा. जयश्री बालुगडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष गावडे यांनी केले तर प्रा. योगिता कुंभार यांनी सूत्रसंचाल व प्रा. हर्षदा राजपुरे यांनी आभार प्रदर्शन केले. भारतीय ज्ञान परंपरांचा गौरव आणि त्यांची आधुनिक जीवनाशी सांगड घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि त्यांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करता येते, असे मत प्राचार्य संतोष गावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केबीपी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या कष्टामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या कोअर टीमने संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. हर्षदा राजपुरे व प्रा. प्रियांका लाड यांनी संपूर्ण कोअर टीमचे प्रमुख म्हणून काम पहिले. प्रा. मंदार टिल्लू यांनी सांस्कृतिक समितीस मार्गदर्शन केले. प्रा. योगिता कुंभार यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५, प्रा. विजया राणे यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्रा. हर्षदा राजपुरे व प्रा. काजल डाकरे यांना सी.एस. इन्स्टिट्यूटचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. काजल डाकरे यांना तसेच भरीव योगदानाबद्दल क्रीडा संचालक डॉ. एकनाथ पवळे व ग्रंथपाल प्रा. अपर्णा साने यांना सन्मानित करण्यात आले. ‘युवातरंग २०२५’ च्या या यशस्वी अध्यायामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी परंपरा प्रस्थापित झाली आहे. युवातरंग २०२४-२५ विजेते १. मॉडेल मेकिंग – प्रथम क्र. – खुशाल पुरडकर (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय) २. मेहेंदी – प्रथम क्र. – नंदिता गायकवाड (प्रगती महाविद्यालय) द्वितीय क्र. – भक्ती तळेकर (एनकेटीटी कॉलेज), तृतीय क्र. – निशा विश्वकर्मा (केबीपी महाविद्यालय), उत्तेजनार्थ – प्रिया चौहान (प्रगती महाविद्यालय), समिक्षा साळवी (VSM कॉलेज) ३. डिजिटल पोस्टर बनवणे – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – प्रिया सिंग (के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ – रेश्मा राठोड (ओ.डी.एम. कॉलेज) ४. श्लोक पठण – प्रथम क्र. – वैभवी पालव (जय हिंद कॉलेज), द्वितीय क्र. – नाझिया शेख (केबीपी महाविद्यालय), तृतीय क्र. – तेजस्विनी गवळी (प्रगती महाविद्यालय) ५. PPT सादरीकरण – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – प्रवेश कुमार (ज्ञानसाधना महाविद्यालय), उत्तेजनार्थ – निशांत यादव (KBP महाविद्यालय), वैभवी पालव (जय हिंद कॉलेज)…