Month: January 2025

दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून हॉल तिकीट

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दाहवीच्या परीक्षेची हॉलतिकीट येत्या सोमवारपासून मिळणार आहेत. सर्व माध्यमिकशाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेची…

पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात ९ ठार

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी…

ध्वज विजयाचा उंच धरा रे…

भारताचा झेंडा जगात फडकावणाऱ्या जगज्जेत्या खेळाडूंन देशातील सर्वोच्च अशा अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा ऑलिम्पक कास्यपदक विजेता खेळाडू स्वप्निल कुसेळेला अर्जुन तर त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडेला द्रोणाचार्य…

चीनचा खोडसाळपणा

भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून चालू आहे. १९६२…

डिजिटल प्रदूषणाचा धोका

मोबाईलचा स्क्रीन बोटांनी वर खाली हलवत असताना स्क्रीनवर मेसेज येतो, की तुमचे क्लाउड स्टोरेज जवळपास भरले आहे. त्यानंतर, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही स्टोरेज खरेदी करता; पण हा सर्व ‌‘क्लाउड डेटा‌’…

नव्याने मैत्रीबंध

अलीकडच्या काळात भारत आणि तालिबान यांच्यातील संबंधांमध्ये बरीच प्रगती दिसून आली आहे. अफगाणिस्तानातील लोकांना मानवतावादी मदतीसाठी भारत सातत्याने प्रयत्न करत आहे. भारताने अद्याप तालिबानला मान्यता दिलेली नाही; परंतु अफगाणिस्तानातील लोकांना…

अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व…

लाडक्या बहिणी प्रमाणे लाडक्या भावाना आधार दया – माजी खासदर हरिभाऊ राठोड

ठाणे : १६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून हजारोंच्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान, मुंबई येथे सहभागी झाले होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून सरकार मायबापाने…

 नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध होणार –  देवेंद्र फडणवीस

अनिल ठाणेकर ठाणे :राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत दिली. तर विविध सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. त्यानुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.५ च्या कलम ३ (१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात येतात. नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत काल मर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिल प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये (परिशिष्ट सोबत जोडले आहे) नमूद केल्याप्रमाणे या सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ०००००

कल्याण लोकसभा क्षेत्रातील प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचना

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बैठक पडली पार कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ  आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेतला. सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या. तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रशांत काळे, निलेश शिंदे, नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.  बदलापूर – कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का याची चाचपणी करण्याची सूचना केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ‘यू टाईप’ रस्त्यांना गती देण्याच्या सूचना केल्या. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना दिल्या. उल्हासनगर मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. 00000