Month: January 2025

 सिध्दीप्रभा फाऊंडेशन आणि गुड मॉर्निंग स्पोर्टस्,   यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक.

‘चिंतामणी चषक – २०२५’ कबड्डी स्पर्धा मुंबई : आकांक्षा क्रीडा, अमर क्रीडा, अंकुर स्पोर्टस्, नवोदित संघ यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या “७व्या चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर प्रथम श्रेणी पुरुष गटात हा मान सिध्दीप्रभा फाऊंडेशन, गुड मॉर्निंग स्पोर्टस्, गोलफादेवी सेवा, बंड्या मारुती मंडळ यांनी पटकाविला. मुंबई चिंचपोकळी येथील सदगुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटात आकांक्षा मंडळाने यश क्रीडा मंडळाचा ४४-२५ असा पाडाव केला. आकांक्षाच्या शंकर साळुंखे, आर्यन पाटील यांनी पहिल्या डावात आक्रमक चढाई पकडीचा खेळ करीत प्रतिस्पर्ध्यावर २ लोण देत २४-११ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात तोच झंझावात कायम ठेवत १९ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. यश मंडळाच्या सोहम खोत, श्रावण पवार यांनी दुसऱ्या डावात थोडाफार प्रतिकार केला.पण तो निष्फळ ठरला. काळाचौकीच्या अमर मंडळाने श्री स्वामी समर्थचा ७०-२७ असा धुव्वा उडविला. सुरुवातीपासून तुफानी खेळ करीत अमरने प्रतिस्पर्ध्यावर ३लोण देत विश्रांतीला ४२-२९ अशी आघाडी घेतली. या पिछाडीने नामोहरम झालेल्या स्वामी समर्थवर विश्रांतीनंतर आणखी २लोण देत अमरने गुणांची सत्तरी गाठली. रमेश वायरकर, दर्शन गुरव यांच्या तुफानी चढाया, त्यांना विघ्नेश झावरे, यश दिसले यांची मिळालेली भक्कम पकडीची साथ यामुळेच अमरने ही किमया साधली. श्री स्वामी समर्थचा विराज कोंजवरने एकाकी लढत दिली. याच गटात अंकुर स्पोर्टस् ने ओम् ज्ञानदीप मंडळाचा प्रतिकार ५२-१४ असा सहज मोडून काढला. मध्यांतराला अंकुरने ३५-०७ अशी मोठी आघाडी घेतल्याने ओम् ज्ञानदीपने नंतर नांगी टाकली. आशिष बदड, दिपेश जोंधळे यांच्या नेत्रदीपक खेळाला अंकुरच्या विजयाचे श्रेय जाते. शेवटच्या सामन्यात नवोदित संघाने जय दत्तगुरु संघाला ५०-२६ असे पराभूत केले. पूर्वार्धापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात २०-१८ अशी नवोदित संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र नवोदितच्या अथर्व सुवर्णा, ऋषिकेश साळवी, रजत मुलांनी यांनी चौफेर खेळ करीत सामना एकतर्फी आपल्या बाजूने झुकविला. जय दत्तगुरुच्या आदित्य घोडेराव, नयन मोहिते यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दाखविता आला नाही. प्रथम श्रेणी पुरुषात गुड मॉर्निंग स्पोर्टस् ने चुरशीच्या लढतीत विकास मंडळाचे आव्हान ४०-३७ असे संपविले. विश्रांतीला २०-१४ अशी आघाडी घेणाऱ्या गुड मॉर्निंगला विश्रांतीनंतर  विकासने विजया करीता चांगलेच झुंजविले. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. प्रफुल्ल कदम, साहिल राणे, तन्मय सावंत, शिवांग मगर गुड मॉर्निंग कडून, तर अवधूत शिंदे, अजित पाटील, विराज सिंग विकास कडून उत्कृष्ट खेळले. याच गटात सिद्धीप्रभा फाऊंडेशनने श्रीराम क्रीडा विश्वस्तला ३९-३२ असे चकवित आगेकूच केली. पहिल्या डावात १६-१४ अशी सिद्धीप्रभाकडे आघाडी होती. मिलिंद पवार, ओमकार पवार, रविकांत सिद्धीप्रभाकडून, तर भावेश महाजन, सौरभ माळी श्रीराम कडून उत्तम खेळले. गोलाफादेवी सेवाने सुनील स्पोर्टस् चा २८-१९ असा पाडाव केला. धनंजय सरोज, विनम्र लाड, अनिकेत झाब्रे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सुनील स्पोर्टस् ला अजूनही परेश चव्हाणच्या खेळावर अवलंबून राहावे लागते. त्याला अमेय दळवीने बरी साथ दिली.शेवटच्या सामन्यात बंड्या मारुतीने यंग प्रभादेवीला ३०-१३ असे नमवित आगेकूच केली. पूर्वार्धात २२-०५ अशी आघाडी घेणाऱ्या बंड्या मारुतीने उत्तरार्धात सावध खेळ केला. ओमराज म्हसकर, शुभम चौगुले, गणेश सापते यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. यंग प्रभादेवीचा शिवकुमार पाटील बरा खेळला.  अधिक माहितीकरिता प्रवीण राणे(सहसचिव) भ्रमणध्वनी क्रमांक ९७७३६६१२९३ यांच्याशी संपर्क साधावा. ०००

कल्याणमध्ये क्रेडाई एमसीएचआयचा ‘गृहोत्सव’

16 लखांपासून 2 कोटीपर्यंतची घरे उपलब्ध कल्याणात 23 जानेवारीपासून प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन कल्याण  : गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपास सुरू असणारी मोठ्या प्रमाणावरील पायाभूत विकासकामे आणि विशेषतः कल्याणच्या आसपास वेगाने सुरू असणारे महत्त्वाकांक्षी एक्स्प्रेस वेचा विचार करता कल्याणला मेजर कनेक्टिव्हिटी हबचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवीन घरं घेण्यासाठी कल्याणला पसंती मिळत असून येत्या काळात हे मुंबई ठाण्यानंतरच सर्वात मोठं शहर बनेल असा विश्वास एमसीएचआयच्या पत्रकार परिषदेत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला. येत्या 23 जानेवारीपासून कल्याणात क्रेडाई एमसीएचआयचे 14 वे प्रॉपर्टी एक्स्पो भरणार आहे.  त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कल्याणातील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांनी या एक्सपोची या शहराचे भविष्य, भविष्यातील गरजा आणि अस्तित्वातील अडचणी यांच्यावरही प्रकाशझोत टाकला. क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवलीमार्फत गेल्या १४ वर्षांपासून जनतेला परवडतील अशी त्यांच्या स्वप्नातील घरं देण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये यंदा 50 हुन अधिक नामांकित विकासकांचे 150 हून अधिक प्रोजेक्ट एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.  क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान लालचौकी येथे सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हे १४ वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुर, टिटवाळा, शिळफाटा, ठाणे परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १६ लाखांपासून ते थेट 2 करोडापर्यंत किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध असणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली. तसेच गेल्या वर्षाचा अंदाज बघता या प्रदर्शनाला २५ हजाराहून अधिक नागरीक भेट देतील असा अंदाज आहे. त्याशिवाय प्रत्येक तासाला लकी ड्रॉ  आणि स्पॉट बुकिंग डिस्काउंट  अशी विविध बक्षिसे जिंकण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे. या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश (बाळयामामा) गोपीनाथ म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राजेश मोरे, आमदार किसन कथोरे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह अनेक मान्यवर या प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष राजेश गुप्ता आणि  सचिव सुनील चव्हाण यांनी दिली. ०००००

 कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयातील नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना कॅन्सर संबधित उपचारांकरिता खाजगी रुग्णालयांमध्ये अथवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारार्थ जावे लागते. त्यामुळे अनेकदा रहिवाशांची अडचण होते. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कॅन्सर रूग्णांकरिता अत्यंत महत्वाची अशी केमोथेरपी सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे हे आग्रही होते. त्या अनुषंगाने नमुंमपाच्या आरोग्य विभागाने गतीमान पावले उचलत टाटा ॲक्ट्रेक (TATA ACTREC) यांच्या समन्वयातून नेरूळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात 10 रूग्णखाटांची डे केअर केमोथेरपी युनीट (Day Care Chemotheropy Unit ) सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये काल  पहिला रूग्ण संदर्भित होऊन या रूग्णावर केमोथेरपी उपचार करण्यात आला आणि या सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकिय समुहासह टाटा ॲक्ट्रेक यांचाही वैद्यकिय समुह उपस्थित होता. डे केअर केमोथेरपी ही सध्याची प्रभावी आणि रुग्णकेंद्रित उपचार पद्धती असून ज्यामुळे केमोथेरपीसाठी नियमित हॉस्पिटलायझेशनची गरज कमी करते. त्यामुळे रुग्णाच्या वेळेची व साधनांची बचत होते. याच उद्देशाने नमुंमपाच्या आरोग्य विभागांतर्गत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे टाटा ॲक्ट्रेक यांचे समन्वयाने 10 रुग्णखाटांचे डे केअर केमोथेरपी युनीट सुरु करण्यात आले आहे. नेरूळ रूग्णालयामध्ये हे डे केअर सेंटर सकाळी 8 वाजल्यापासून कार्यान्वित राहील. रुग्णांवर उपचाराकरिता येथे फिजीशिअन, स्टाफ नर्सेस व आवश्यकतेनुसार इतर विशेषज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. हे डे केअर सेंटर सुरु करणेकरिता कॅन्सर उपचार संबधित सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना टाटा ॲक्ट्रेक, खारघर येथे प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले होते. सॉलीड ट्युमर्स (Solid Tumors) च्या रुग्णांवर या डे केअर सेंटर (Day Care center) मध्ये उपचार करण्यात येणार आहेत. सदर उपचाराचे निदान व केमोथेरपीचा पहिला डोस टाटा अँक्ट्रेक येथे देण्यात येईल व रुग्ण हायमोडायनॅमिकली स्टेबल (Haemodynamically stable) असल्यास व ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची (ICU) आवश्यकता नसेल अशा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांना केमोथेरपीच्या (Chemotherapy) दुस-या डोसपासून या डे केअर सेंटरमध्ये उपचार दिले जातील. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना टाटा रुग्णालयापर्यंत जावे न लागता नवी मुंबईतच नमुंमपाच्या नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात औषधोपचाराचा लाभ घेता येईल. त्यामुळे टाटा रुग्णालयात दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अपॉईंटमेंट मिळाल्यावर उपचारांकरिता अगदी पहाटेसुध्दा उठून जाण्याची व दिवसभर रांगेत थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे नवी मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांना होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी होणार आहे. 00000

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाश

अलिबाग : अशोक गायकवाड रायगड जिल्ह्याचे सन २०२४ चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी श्”जयसिंग मेहेत्रे, सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती वृषाली माकर आदि उपस्थित होते. 0000

विधी सेवा शिबीर तसंच शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्या – न्या. ए.एस.राजंदेकर

अशोक गायकवाड रायगड : विधी सेवा शिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग व जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी, सकाळी ११.०० वा. बालगंर्धव रंगभवन, रिलायन्स पेट्रोकेमिकल टाउनशिप, नागोठणे, ता. रोहा येथे “विधी सेवा शिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. 000000

डोंबिवली क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत सागरचे २ धावांत ८ बळी

६८ वी शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धा ठाणे  : सागर मिमरोटची भेदक गोलंदाजी, प्रणव यादवच्या शतकी खेळीसह दुसऱ्या  बळीसाठी केलेली ११७ धावांच्या शतकी भागीदारीमुळे डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनने  डेक्कन क्रिकेट फाऊंडेशनचा २११…

५वी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा

यजमान स्पोर्टिंग युनियन आणि साईनाथ अशी अंतिम झुंज   मुंबई, दि. १७ जानेवारी : साईनाथ स्पोर्ट्सने गतविजेत्या डॅशिंग सी. सी.चा २३ धावांनी पराभव करुन ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांची गाठ यजमान स्पोर्टिंग युनियनशी पडेल. कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेमध्ये यजमान संघाने मोठ्या धक्क्याची नोंद करताना भामा सी.सी.चा ७ विकेटनी पराभव केला. यापूर्वी गटसाखळीमध्ये पराभूत संघांनी मोठमोठ्या धावसंख्या रचल्या होत्या आणि विशेष म्हणजे स्पर्धेतील ३ शतके याच संघांच्या खेळाडूंनी ठोकली होती. साईनाथने प्रथम फलंदाजीचा निर्णय  घेत ९ बाद १२२ अशी तुटपुंजी धावसंख्या उभी केली. त्यांची किंजल कुमारी ही एकमेव खेळाडू विशीचा टप्पा गाठू शकली. श्रेया सुरेश, निलाक्षी तलाठी आणि वेदिका मंत्री यांच्या फिरकीने जसे साईनाथच्या फलंदाजांना जखडून ठेवले. तसे मग साईनाथच्या श्रीनी सोनी (२१/३ बळी) आणि श्रावणी पाटील यांनी डॅशिंगला लय सापडूच दिली नाही. साखळीत शतके ठोकणारी खुशी निजाई (३३) हीने थोडीफार चिकाटी दाखवली पण ती व्यर्थ ठरली. भामाने १९.३ षटकांमध्ये सर्व बाद ११३ धावा केल्या. त्यांच्या अंजू सिंग हिला आज भोपळाही फोडता आला नाही. अंजूप्रमाणे शतक ठोकणारी प्रिती पटेल देखील अपयशी ठरली. काव्या भगवंत (२१/३ बळी) आणि गगन मुल्कला यांच्यासमोर इतर फलंदाजांचा प्रभाव पडला नाही. त्याला अपवाद हृदयेशा पाटील (२९) आणि सृष्टी कुडाळकर (२२) यांचा. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (२८) आणि प्रांजल मळेकर (नाबाद ६०) यांनी ६० धावांची सलामी दिली. ध्रुवी धावचीत झाल्यावर प्रांजलने एक बाजू लावून धरली आणि वेळ येताच ५ चौकार ठोकत विजय साध्य केला. त्याआधी अंजू सिंगने आपल्या ऑफ स्पिनवर दोन फलंदाजांना १५व्या षटकात बाद करुन काही काळ अवश्य सनसनाटी पैदा केली होती. संक्षिप्त धावफलक साईनाथ स्पोर्ट्स २० षटकात ९ बाद १२२ (किंजल कुमारी २०, श्रावणी पाटील १९, श्रेया सुरेश १५ धावात २ बळी, निलाक्षी तलाठी २६ धावात २ बळी, वेदिका मंत्री ३० धावात २ बळी) वि. वि. डॅशिंग सी. सी. २० षटकात ८ बाद ९९ (खुशी ‌निजाई ३३, श्रीनी सोनी २१ धावात ३ बळी, श्रावणी पाटील १० धावात २ बळी) सामन्यात सर्वोत्तम : श्रीनी सोनी भामा सी. सी. १९.३ षटकात सर्वबाद ११४ (हृदयेशा पाटील २९, सृष्टी कुडाळकर २२, काव्या भगवंत २२ धावात ३ बळी, गगन मुल्कला २१ धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १८.२ षटकात ३ बाद ११५ (ध्रुवी पटेल २८, प्रांजल मळेकर नाबाद ६०, अंजू सिंग १४ धावात २ बळी) सामन्याता सर्वोत्तम: प्रांजल मळेकर

आज कुर्ला येथे‌ मानव सेवा प्रतिष्ठानची आंतर शालेय कबड्डी स्पर्धा‌

मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान कुर्ला शाखा आयोजित १४ वर्षाखालील शालेय मुलांची  कबड्डी स्पर्धा १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता  गांधी मैदानावर होणार आहे. स्पर्धेत महिला मंडळ माध्यमिक विद्यालय कुर्ला, सेंट…

विवाद कामांच्या तासांचा

  कोणत्याही देशाची अर्थव्यवस्थेचा विकास, प्रगती होण्यासाठी युवा वर्गाचा हातभार असला पाहिजे, त्याबाबत दुमत नाही. भारतासारख्या देशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक असताना नोकरांचे वय वाढवणे, कामाचे तास वाढवणे यामुळे देशाच्या प्रगतीला…