Month: January 2025

रेल्वेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतनाचा फरक मिळणार – जगदीश खैरालिया

ठाणे : मध्य रेल्वेच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांमधील पॉवरकार मध्ये टेक्निशियन पदांवर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने दाखल केलेल्या वसुली दावा क्र. MCA – 11/ 2022 मध्ये निर्गमित…

मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे – रोहन घुगे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन १६ जानेवारी रोजी पलावा सिटी, कल्याण येथे करण्यात आला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे…

पर्यावरपूरक उत्सव साजरे करण्यासाठी ठाणे महापालिकेने दिली जागा, शाडूची माती पुरवण्याची ग्वाही

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी साधला संवाद ठाणे :पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे ही समाज म्हणून आपली सगळ्यांची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे आजवरप्रमाणेच मूर्तीकारांनी महापालिकेस सहकार्य करावे. त्यासाठी…

ठाण्यातील चरई येथे सीजीएचएसचे वेलनेस सेंटर सुरू होणार – खासदार नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर ठाणे :सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन, ठाणे या केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ठाण्यात सीजीएचएसचे वेलनेस सेंटर (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती.…

नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा

हरिभाऊ लाखे नाशिक : वर्दळीचे ठिकाण, विशिष्ट काळात होणारी गर्दी आणि ना फेरीवाला क्षेत्राचा अभ्यास करून आकारास आलेल्या, परंतु करोनापश्चात ठेकेदाराच्या कार्यपद्धतीने बारगळलेल्या शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांना नव्याने पुनरुज्जीवित करण्याचे…

१९ जानेवारी रोजीच्या ‘वेध अलिबागचे आयोजन मीरा बोरवणकर, अरविंद जगताप, चिन्मय गवाणकर, आभा चौबळ यांच्या मुलाखती घेणार डॉ आनंद नाडकर्णी अशोक गायकवाड अलिबाग : विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH), ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरसीएफ वसाहतीमध्ये दिनांक १९ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी वेध अलिबागचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत भूतपूर्व आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, “चला हवा येऊ द्या” चे पत्रलेखक अरविंद जगताप, मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ यांसह डिझाईन जत्रा या आगळया सामाजिक-स्थापत्य संस्थेच्या वास्तुविशारदांच्या मुलाखती विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी घेणार आहेत. अलिबाग मधील हे दुसरं वेध सम्मेलन. गेल्यावर्षी १४ जानेवारीला झालेल्या शुभारंभाच्या वेध अलिबाग कार्यक्रमात स्थानिक अंध उद्योजक सागर आणि नेत्रा पाटील, निसर्गजीवी रानमाणूस प्रसाद गावडे, पर्यावरणप्रेमी उद्योजिका अमिता देशमुख, अलिबागस्थित हॉलीवूड-बॉलीवूडचे ख्यातकीर्त आर्ट डिरेक्टर दिलीप मोरे आणि भारताचे लेकमॅन म्हणून ओळख असलेले आनंद मल्लिगवड यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमा दरम्यान डॉ आनंद नाडकर्णी यांनी ध्येयवादी व्यक्तिमत्त्वांच्या जगण्यातले नेमके मर्म उपस्थितांसमोर उलगडले होते. दिनांक १९ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी आयोजित वेध-अलिबाग २०२५ ची थीम आहे, ‘रंग-उमंग’. यात भूतपूर्व आयपीएस अधिकारी मिरां चढ्ढा बोरवणकर, संवेदनशील साहित्यिक अरविंद जगताप, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ आणि डिझाईन जत्रा या सामाजिक-स्थापत्य संस्थेचे वास्तुविशारद विनिता कौर एम. चिरागिया, प्रतीक धनमेर, शार्दुल पाटील अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांच्या जीवनप्रवासाचे रंग उलगडले जाणार आहेत. या सुविख्यात व्यक्तींच्या यशस्वीतेमागची ऊर्जा, उत्साह (उमंग) डॉ नाडकर्णी घेत असलेल्या मुलाखतींच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी अलिबाग परिसरातील विद्यार्ध्यांसह सुजाण नागरिक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून आरसीएफ लिमिटेड तर सह प्रायोजक म्हणून आदर्श नागरी पतसंस्था व गेल (इंडिया) यांचे सहाय्य लाभले आहे. वेध-अलिबागच्या निमित्ताने एक नवे वैचारिक दालन अलिबागकरांसाठी खुले होत असून या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमातील सहभागासाठी ८६९८७९५७९६ (उमेश वाळंज) किंवा ९८५०९६५४५२ (अनिल आगाशे) यांच्याशी संपर्क साधावा. 00000

मीरा बोरवणकर, अरविंद जगताप, चिन्मय गवाणकर, आभा चौबळ यांच्या मुलाखती घेणार डॉ आनंद नाडकर्णी   अशोक गायकवाड अलिबाग : विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH), ठाणे…

१ हजार १६ गावे, वाड्यांच्या पाणीटंचाईसाठी ५ कोटी ६२ लाख‌ांचा आराखडा तयार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग :रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले – खासदार वर्षा गायकवाड.

सुरक्षा असलेल्या व्यक्तीच असुरक्षित तर सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय? कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला; मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे. मुंबई : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर रात्री त्यांच्या घरात…

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

कल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने खेडगल्ली म्युनिसिपल स्कूल, वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा `इथे मराठीचिये नगरी’ कार्यक्रम

मुंबई : गाथा सप्तशतिपासून आजपर्यंत बदलत गेलेली भाषेची रुपे ही गाणे व अभिवाचन यातून उलगडून दाखवणारा डॉ. `इथे मराठीचिये नगरी’ हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २६ जानेवारी २०२५…