Month: January 2025

सीपीएमचे गुजरात राज्य अधिवेशन उपलेटा येथे उत्साहात संपन्न

अनिल ठाणेकर ठाणे : ११ व १२ जानेवारीला राजकोट जिल्ह्यातील उपलेटा शहरात कॉम्रेड सीताराम येचुरी नगर येथे सीपीआय(एम) चे २४वे गुजरात राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनात १० जिल्ह्यांतील १९२ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी ५६ महिला प्रतिनिधी होत्या. तसेच तरुणांचाही मोठा सहभाग होता. अधिवेशनाची सुरुवात मगनभाई जिवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. शहीदांना पुष्पांजली अर्पण करून शोक प्रस्ताव घेण्यात आला. यांनतर उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद माजी राज्य सचिव प्रागजीभाई भांभी यांनी भूषवले. स्वागत समितीच्या अध्यक्षा किरणबेन कालावाडिया यांनी सर्वांचे स्वागत केले. अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. अशोक ढवळे यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात साम्राज्यवाद व झायोनिझमचा आणि राष्ट्रीय क्षेत्रात नव-फॅसिस्ट आरएसएस-भाजपचा धोका स्पष्ट केला. यावेळी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकतेची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच सीपीआय(एम) ची स्वतंत्र ताकद आणि प्रभाव वेगाने वाढवण्याची निकड देखील विषद केली.अधिवेशनात अहवाल दोन भाग्गत सादर करण्यात आला आणि दोन भागात त्यावर चर्चा झाली. राज्य सचिव एच.आय.भट्ट यांनी राजकीय भाग मांडला आणि केंद्रीय समिती सदस्य अरुण मेहता यांनी संघटनात्मक भाग मांडला. पहिल्या भागावर २४ प्रतिनिधींची भाषणे झाली आणि दुसऱ्या भागावर १७ प्रतिनिधींची भाषणे झाली. अहवाल एकमताने मंजूर झाला, तसेच प्रमुख मुद्द्यांवर १२ ठरावही करण्यात आले. पहिल्या दिवशी उपलेटा टाऊन हॉलमध्ये “शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. डॉ. अशोक ढवळे, मुरलीधरन आणि दयाभाई गजेरा यांची भाषणे झाली. अधिवेशनात माजी राज्य सचिव सुबोध मेहता यांनी लिहिलेल्या “कम्युनिस्ट विचारसरणी” या गुजराती पुस्तिकेची नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. उदय जोशी यांनी क्रेडेन्शियल अहवाल सादर केला. या अधिवेशनाने एकमताने ३० सदस्यांची नवीन राज्य समिती आणि कायमस्वरूपी निमंत्रितांची एकमताने निवड केली. नवीन राज्य समितीने एकमताने एच. आय. भट्ट यांची राज्य सचिवपदी फेरनिवड केली आणि ९ सदस्यांचे राज्य सचिवमंडळ निवडले. मदुराई पक्ष काँग्रेससाठी ६ प्रतिनिधी, २ पर्यायी प्रतिनिधी आणि २ निरीक्षकांची निवड केली. मुरलीधरन यांनी समारोपाचे भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी संघटनेशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. उपलेटा तहसील आणि राजकोट जिल्हा संचाने परिषदेसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. आयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार मानल्यानंतर, मोठ्या उत्साहात अधिवेशनाची सांगता झाली.

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट भामाच्या प्रिती अय्यरचे नाबाद शतक

यजमान स्पोर्टिंग युनियन, भामा सी.सी. विजयी मुंबई : सलामीच्या प्रिती अय्यरचे फटकेबाज शतक आणि तिने आयुषी इंदुलकर (२६) आणि अंजू सिंग (नाबाद ६७) यांच्यासह केलेल्या अनुक्रमे १०० आणि ११५ धावांच्या भागिदाऱ्या यामुळे भामा क्रिकेट क्लबला ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये जे भाटिय़ा क्रिकेट क्लबवर १३२ धावांनी मोठा विजय प्राप्त करता आला. स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अन्य एका साखळी लढतीमध्ये यजमान स्पोर्टिंग युनियनने देखील ५ विकेटसनी महाराष्ट्र यंगला पराभूत केले. त्यांच्या या विजयामध्ये सलामीच्या प्रांजल मयेकर (५५) हिची महत्वपूर्ण भूमिका होती. प्रितीच्या झंझावाता पुढे हतबल झालेल्या जे. भाटिया संघाला प्रतिस्पर्ध्यांच्या एक बाद २१५ या प्रचंड धावसंख्येला केवळ ९ बाद ८३ असे प्रतिउत्तर देता आले. प्रितीने ७२ चेंडूमध्ये नाबाद ११५ धावांच्या खेळीमध्ये १७ चौकार आणि ३ षटकार होते. अंजू सिंगने भाटियाच्या जखमांवर मीठ चोळताना केवळ २९ चेंडूत ६७ धावा फटकावताना ६ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली. अंजूने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना १२ धावात २ बळीही देखील घेतले. कर्णधार सानया जोशी नाबाद ५२ हिच्या खेळीमुळे महाराष्ट्र यंगला ७ बाद १२१ अशी माफक धावसंख्या रचता आली. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (३०) प्रांजल यांनी ८६ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १०५ धावांवर दुसरी विकेट गमावण्या पाठोपाठ त्यांनी आणखी तीन विकेट गमावत काहीश्या तणावाखाली आपले लक्ष १८व्या षटकात पार केले. आज माटुंगा जिमखाना येथे मुंबई क्रिकेटचे मानद सचिव अभय हड़प यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अविसा आणि “एसजी”चे विजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संक्षिप्त धावफलक महाराष्ट्र यंग २० षटकात ७ बाद १२१ धावा (जयनी शाह २३, सानया जोशी नाबाद ५२, गगना मुल्का १५ धावात ३ बळी, तन्वी चव्हाण २० धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १७.५ षटकात १२२ धावा (ध्रुवी पटेल ३०, प्रांजल मयेकर ५५, अनन्या अय्यर २८ धावात २ बळी, जैनी शाह १९ धावात २ बळी) सर्वोत्तम प्रांजल मयेकर भामा सी. सी. २० षटकात १ बाद २१५ धावा (प्रीती अय्यर नाबाद ११५, आयुषी इंदुलकर २६, अंजू सिंग नाबाद ६७) विजयी विरुद्ध जे. भाटिया सी. सी. २० षटकात ९ बाद ८३ (इशा शाह २१, सौम्या पान्डे २३ धावात २ बळी, अंजू सिंग १२ धावात २ बळी, चांदनी कनुजिया १० धावात ३ बळी) सामन्यात सर्वोत्तम प्रिती अय्यर. 00000

ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने विजेतेपद राखले

मुंबई : ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पोर्ट्स फिल्डचे ११८ धावांचे आव्हान तब्बल ६ गडी आणि १७ चेंडू राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती…

वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही – ॲड. पारिजात पांडे

अनिल ठाणेकर ठाणे : वक्फ कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. यात मुख्य न्याय तत्वाचे (प्रिन्सिपल ऑफ जस्टीस) पालन होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. असे परखड मत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲड. पारिजात पांडे यांनी व्यक्त केले. तरीही, धार्मिक आधारावर उन्माद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. ठाण्यात सुरु असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘कायदा वक्फ बोर्डाचा’ हे पाचवे पुष्प ॲड. पारिजात पांडे यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, या सत्राचे अध्यक्ष ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत कदम, माजी उपमहापौर सुभाष काळे उपस्थित होते. १९९५ साली काँग्रेस सरकारने व्यापक अधिकार दिलेल्या वक्फ कायद्यावर लख्ख प्रकाश टाकून ॲड. पांडे यांनी, वक्फ बोर्डाच्या मर्यादांना कात्री लावण्यासाठी विद्यमान केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रस्तावित ४० दुरुस्त्यांचा मुद्देसूद आढावा घेतला. ही धार्मिक लढाई निश्चित नाही. हा वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, याची ही लढाई आहे. ११३ कलमे असलेला हा वक्फ कायदा सर्वसामान्यांना आपला वाटत नाही. तरीही धार्मिक आधारावर जो उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, हा कायदा सर्वसामान्य व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार देतो की नाही, यात प्रिन्सिपल ऑफ जस्टीस फॉलो होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर संविधानाच्या चौकटीत वक्फ कायदा बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. आणि हे प्रस्तावित बदल बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सुचविलेले असून एकप्रकारे बोर्डाच्या कामाची गती वाढवण्यासाठी बदल आवश्यकच असल्याचे ॲड. पांडे यांनी नमुद केले. चौकट केंद्रात सुदैवाने बदल करण्याची मानसिकता असलेले सरकार विराजमान आहे. असा उल्लेख करीत ॲड. पांडे यांनी एकप्रकारे मोदी सरकारची स्तुती करून, या सरकारने वक्फ कायद्याचे नाव ‘एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा’ (युनिफाईड वफ्फ मॅनेजमेंट इन्पॉवरमेंट इफिशिएन्सी डेव्हलपमेंट ॲक्ट) असे केले. तसेच १४ ऑगस्ट १९४७ नंतर पाकिस्तान वा बांग्लादेश येथे गेलेल्याच्या इथल्या जागा वक्फच्या नावे होत्या. ही तरतुदच आता प्रस्तावित कायद्यात बदलण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हात ठेवाल ते वक्फचे हे चालणार नाही. याकडे ॲड. पांडे यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने वक्फ कायद्यातील मर्यादेच्या तरतुदी रद्द करण्यासाठी सादर केलेल्या दुरुस्ती विधेयकाविरोधात सध्या जो फेक नॅरेटीव्हचा प्रकार सुरु आहे तो समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे. असे स्पष्ट करून ॲड.पांडे यांनी, त्यांचे बालेकिल्ले १०० टक्के ढासळणार असुन बालेकिल्यावरून त्यांचे निशाणही उतरणार आहे. असा सूचक इशारा दिला. तसेच आपणही समाज म्हणुन एक जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याची वेळ आली असल्याचे प्रेरीत करताना त्यांनी रामायणातील घटनेचा दाखला दिला.

१६ वर्षाखालील गटात लोबो फेरडीनने मारली बाजी

चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा   मुंबई : ओढ हिरवळी आणि माझगाव येथील सर एली कदुरी शाळेतर्फ विविध वयोगटासाठी चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १६ वर्षाखालील वयोगटात लोबो फेरडीनने ४.५…

नवी मुंबई सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू वर मेळावा संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ११ जानेवारी रोजी केमिस्ट भवन येथे १५ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला, अशी माहिती मराठा…

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

अशोक गायकवाड अलिबाग : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या नेतृत्वाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पाच पुरुष व एक महिला या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्हा हद्दीमध्ये गेले दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत होती. त्याअनुषंगाने १२ जानेवारीला महाड एमआयडीसी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि, मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथे काही बांगलादेशी कामगार त्यांचे अस्तित्व लपवून अवैधरीत्या घुसखोरी करून वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करीत आहे. त्या अनुषंगाने महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी येथे चंद्रकांत शिंदे याचे घरात छापा टाकला असता त्यामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांना अवैधरीत्या वास्तव्यास असलेले ०६ बांगलादेशी नागरिक मिळून आले. त्यांना मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथून ताब्यात घेण्यात आले. सदर बांगलादेशी नागरिकांना पी.डी.आय.पी.एल या बांधकाम कंपनीने कामावर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बांगलादेशी नागरीकांकडे पोलिसांनी बांगलादेशातून भारतात येण्याकरिता वैध प्रवासी कागदपत्राची मागणी केली असता त्या इसमांनी आमच्या कडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. आम्ही बांगलादेशातील गरिबी व उपासमारीस कंटाळून रोजगाराकरिता सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केलेला आहे. अशी माहिती दिल्याने सदर इसमांनविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०६/२०२५ कलम ३ (१) (अ ) परकीय नागरिक आदेश १९४८, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४, पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० चे कलम ३ (अ ) ६(अ ) प्रमाणे बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहे. १) माणिक तुफेझेल विशष वय ३२ वर्ष धंदा सेंट्रिंग चे काम सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. सुबोधपुर बडतळा बाजार, पो. ठाणे दश्शोना, जि. चौंडगा जोषारे खुलना, देश -बांगलादेश, २) नूर इस्माल बिस वास उर्फ सिकंदर रोने मानेरूलखान वय ३० वर्ष सध्या रा. वरंध ता. महाड जि. रायगड मूळ रा. बासग्रॅम, पोलीस ठाणे कालिया, विभाग खुलना जि. नोडाई, देश बांगलादेश, ३) सागर मिराज शेख वय ३० वर्ष रा. पिंपळदरी ता.महाड जि. रायगड मूळ रा.उत्तर शिंगे, पोलीस ठाणा नोडल, जि. नोडल विभाग खुलना, देश बांगलादेश, ४) शांतु शकुरअली शेख वय-१९ वर्ष सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. पुरुलिया, पोलीस ठाणा कालिया, जि. नाडाई विभाग खुलना, देश- बांगलादेश., ५) शिलीम हामशेर परामणी वय-४० वर्ष, सध्या राहणार पिंपळदरी तालुका महाड जिल्हा रायगड, मूळ रा अब्दुलपुर ठाणा-लालपुर जिल्हा नाटोर विभाग रासई देश बांगलादेश असे पाच पुरुष व एक महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव विभाग पुष्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी प्रभारी सपोनि/जीवन माने व पोसई/संजय मुंडे, पोसई/समेळ सुर्वे. सफौ/हनुमंत पवार, सफौ/दीपक ढेपे, पोह/राजेश गोरेगावकर, पोह/चनप्पा अंबरगे, पोह/सिद्धेश मोरे, पोना/राजेश माने, पोना/सतीश बोटे,पोना/गणेश भैलुमे,पोशी/सुनील पाटील, पोशी/सुनीलकांजर, पोशी/शीतल, बंडगर, पोशी/निखीलबळे, पोशी/अमोल कुंभार, पोशी/शुभम पवार, पोशी/सुजील गोंधळी, पोशी/सागर गुलींग, पोशी/विजय दळवे मपोशी/ तेजश्री भोईर, यांनी गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

‘वैश्य मेळावा, लक्ष्य २०२५’ संपन्न

ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…

ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर निधी मिळवून देणार!

 उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची ग्वाही ठाणे : मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग-व्यवसायांकडून देण्यात येणारा सीएसआर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ज्येष्ठ लेखक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्रकादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक-कवी प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे, किशोर कदम (सौमित्र), कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, शारदा प्रकाशनाचे प्रा. संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संन्यस्त ज्वालामुखी’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘वाचाल तर वाचाल’ असे ट्रकच्या मागे लिहून बिंबवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यात चांगले लेखक आणि वक्ते तयार व्हायला हवेत. हिंदुत्व काय आहे हे जगाला ठासून सांगणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला सांगायला हवेत. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ ही कादंबरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये पोहोचायला हवी, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्राने स्वामी विवेकानंदांवर नेहमीच प्रेम केले आहे. लोकमान्य टिळकांपासून वि. रा. करंदीकरांपर्यंत अनेकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ओळख मराठी समाजाला करून दिली आहे. त्या परंपरेतील स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महाराष्ट्रातील आजचे पाईक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे आहेत, अशा शब्दांत डॉ. सदानंद मोरे यांनी चरित्रलेखक प्रा. डॉ. ढवळ यांचा गौरव केला. तर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, धर्म आणि राजसत्ता यांचे द्वंद्व भारतीय समाजात पूर्वापार आहे. हिंदू धर्म नेमका काय आहे, हे सांगणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. मात्र हिंदू धर्माच्या शोधात स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान भारतातील डाव्या-उजव्या अशा सर्वच विचारसरणींना स्वीकारार्ह वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळे आजच्या पिढीला विवेकानंदांचे विचारच तारू शकतात, अशी भावना डॉ. शोभणे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी कवी-गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनीदेखील स्वामी विवेकानंदांच्या विचाराची आजच्या पिढीला ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. याबाबत बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भेसळ झाली आहे. विचार, संस्कार, संस्कृती, नीती यांचा विसर पडत चालल्याची परिस्थिती आहे. अशा काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या कादंबरीच्या माध्यमातून आजच्या पिढीपुढे आणण्याचे काम झाले आहे, असे प्रतिपादन प्रा. दवणे यांनी केले. तर कवी-गीतकार व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) याप्रसंगी म्हणाले की, भारतीय समाजातील अनेक महनीय व्यक्तींच्या जीवनविचाराला आध्यात्मिकतेची किनार आहे. याचे कारण त्यांनी संपूर्ण देश पिंजून काqढला, आपला संपूर्ण समाज जाणून घेतला. त्यातूनच त्यांनी आध्यात्मिक विचारांचा संदेश आपल्याला दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील आपापला धर्म, स्व-धर्म शोधण्याची प्रेरणा जगाला दिली आहे, असे प्रतिपादन किशोर कदम यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कवी प्रा. अशोक बागवे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मनोगत व्यक्त करून ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकाशनसोहळ्याचे प्रास्ताविक शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी केले, तर प्रा. संतोष राणे यांनी प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कार्यक्रमाचा समारोप गायिका फाल्गुनी नातु यांच्या भैरवी गायनाने झाली, तर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले.

संविधान अमृत महोत्सव साजरा 

 कल्याणमध्ये वकील संघटनांच्या वतीने कल्याण :  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा गजानन चव्हाण यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे दिवाणी वकील संघटना, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना कल्याण, उल्हासनगर वकील संघटना, मुरबाड…