Month: January 2025

केडीएमसी क्षेत्रात बांधकाम परवाना मिळणार ऑनलाईन

 त्रासमुक्त परवानग्या मिळण्याण्यासाठी आँनलाईन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन वर्षात, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा  टिडीआर्, रिडेव्हलमेन्ट,  परवानगी शुल्क फी, आदी परवानग्या आँनलाईन माध्यमातून राबिविण्यासाठी मनपा यंत्रणा सज्ज झाली आहे. केडीएमसीच्या मते, बांधकाम आराखड्यांसाठी ही सुविधा आधीच होती, परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे लोक बांधकाम परवानगी ऑफलाइन घेत असत. अलीकडेच, बांधकाम परवानगीशी संबंधित कामात पारदर्शकता आणण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  केडीएमसीच्या नगररचना विभागाने गुरुवारी शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांची बैठक बोलावली, जिथे त्यांना इमारत आराखड्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि त्याबाबत उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांचे निराकरण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. केडीएमसी नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक नगररचना संचालक नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी सांगितले की ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. कोणताही विकासक देशातील कोठूनही ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी आराखडा सादर करू शकतो. टेंगळे यांनी सांगितले की, या ऑनलाइन सुविधेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या योजनेशी संबंधित फाइल कोणत्या विभागात आहे हे पाहता येईल आणि जर त्या फाईलमध्ये काही प्रलंबित कागदपत्रे असतील तर ती तो ऑनलाइन पाठवू शकेल. या सर्व कामांसाठी त्याला कार्यालयात जावे लागणार नाही. केडीएमसी इमारत आराखडे ऑनलाइन सादर करण्यासाठी आणि मंजुरीसाठी राज्य सरकारने प्रदान केलेल्या बीपीएमएस सॉफ्टवेअरचा वापर करत आहे आणि ते सुरळीतपणे काम करत आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांनी केडीएमसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत विकासक विमल ठक्कर म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही ऑनलाइन झाले आहे, ज्यामुळे काम सोपे होत आहे. अशा परिस्थितीत, बांधकाम आराखड्याची परवानगी ऑनलाइन असल्याने, आम्हाला आता अधिकाऱ्यांना वारंवार भेटण्यासाठी जावे लागणार नाही आणि आराखडा मंजूर करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे होईल.” या आँनलाईन परवानगी प्रक्रिया मुळे जलदगतीने तसेच पारदर्शक, परवानगी प्रक्रिया मार्ग मोकळा झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

नमुंमपा मुख्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते, इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत…

आधुनिक भारत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे’ – अभय बापट

ठाणे : सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भूत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचे गारुड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे, असे प्रतिपादन…

श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा.- सद्गुरू श्री वेणाभारती महाराज

अनिल ठाणेकर ठाणे : आताच्या पिढीने इतका ताण वाढवुन घेतलाय की, हा ताण कसा कमी करायचा, त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे. तेव्हा, तणावमुक्त होण्यासाठी श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. असे उदबोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले. ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ हे तिसरे पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यानी गुंफले. यावेळी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष सीए संजीव ब्रम्हे, सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पूरोहित, विद्याधर वैशंपायन तसेच, सौ.कमल संजय केळकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत. हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळीकडून जाणून घ्या. आपल्या परंपरा सोडु नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर, भाग्याशी निगडीत आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या, पण विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्याकडे अमुक आहे, तमुक आहे म्हणुन आपल्याकडे हवे ही असुया नसावी. पाळण्यात होतो, तेव्हा कुठे आजार होते ? शरीर आजारी होत नाही तर, मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्विकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत. असे स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवला आहे. जे आपल्या वेदामध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन ग्रंथामध्ये लिहिले आहे ते सर्वोत्कृष्ठ आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आले पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा उपनिषदांपेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असुन भगवद्गीता हा आद्यग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वजांचे देणे नाकारले तर, ताण वाढणे स्वाभाविक आहे. तेव्हा, ताण कमी करण्यासाठी श्रीमत् दासबोधामधील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तीचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. जीवनात प्रवाही राहुन सगळ्या गोष्टी सहज करायला शिका, घरातील देवघरात मुक्तीच्या शक्तीचा धागा आहे, पुढील अनंत पिढयांसाठी तो जपुन ठेवत ह्या मुक्ती त्यांना सोपवा. अशा प्रकारे अध्यात्म आणि ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व सोदाहरण विषद करून सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, गृहस्थधर्मातील कौटुंबिक गमतीजमती सांगत उपस्थित श्रोत्यांना तणावमुक्तीसाठी अनेक सहजसुलभ मार्मिक तोडगे देखील सुचवले. चौकट आजकाल सत्य ऐकण्याची कुणाचीच हिंमत नाही. कारण सत्य कटू असते, ते सत्य नारायण आहे. तेव्हा, रस्त्यावर असेल अथवा कुठेही सत्यनारायणाच्या दर्शनाचा संकोच करू नका. किंबहुना, वर्षभरात प्रत्येकाच्या घरात एक तरी सत्यनारायण झाला पाहीजे. घरातील हॉलमध्ये सत्यनारायण आणि महाप्रसाद टेरेसवर असे प्रघात टाळा. असे स्पष्ट करून श्री वेणाभारती यांनी केळीच्या पानावरील शिऱ्याच्या प्रसादाची महती विषद केली.

भुजबळांविषयी न बोलण्याचा माणिक कोकाटे यांना अजित पवार गटाचा आदेश

हरिभाऊ लाखे नाशिक –मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजित पवार) प्रमुख नेत्यांना लक्ष्य करणारे माजीमंत्री छगन भुजबळ आणि त्यांना सडेतोड भाषेत प्रत्युत्तर देणारे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्यातील कलगीतुरा तूर्तास…

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सांस्कृतिक महोत्सव संपन्न

 बक्षीसपात्र विद्यार्थ्यांनी सादर केली १३ नृत्य आणि २ नाटके ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण असून त्यांना बाल रंगकर्मी योजनेत प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांचे एखादे बालनाट्य बसवून महाराष्ट्राभर त्याचे २५ प्रयोग व्हावेत, असे प्रतिपादन अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी ठाणे महानगरपालिका शाळांचा सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात केले. ठाणे महानगरपालिका शाळांचा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे नुकताच संपन्न झाला. सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ मध्ये नृत्य आणि नाट्य विभाग अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. नृत्यविभागात इयत्ता १ ली ते ५वीच्या एकूण २४, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या ६१ शाळांनी, तर नाट्य विभागांमध्ये १९ अशा एकूण १०४ शाळांनी भाग घेतला होता. त्यामधून बक्षीसपात्र विद्यार्थी व शाळांना मंगेश देसाई, बालकलाकार  मायरा वायकूळ, उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षीसपात्र १३ नृत्ये आणि २ नाटके असे १५ कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले प्रारंभी ठाणे मनपा शाळा क्र. १३. खोपटच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी विद्यार्थी बालकलाकारांचे आणि मार्गदर्शक शिक्षकाचे कौतुक केले. तसेच, बालकलाकार मायरा हिने सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, गटाधिकारी संगीता बामणे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बाबाजी फापाळे, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ठाणे व पालघरचे संचालक जगन्नाथ जाधव आदी उपस्थित होते. सांस्कृतिक समिती २०२४-२५च्या कार्याध्यक्षा अनघा पालांडे पानी उपस्थिताचे आभार मानले. गटप्रमुख प्रेरणा कदम यांच्या राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिती सदस्य सुरेश पाटील, नूतन बांदेकर,  सहचिटणीस नीलिमा पाटील यांनी केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा सन २०२४-२५चा निकाल पुढीलप्रमाणे – बालनाट्य विभाग, इयत्ता 1 ते 8 1) प्रथम क्रमांक – शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहा) 2) द्वितीय क्रमांक – शाळा क्रमांक 125,गट क्रमांक 7 (धरती की फिर्याद) 3) तृतीय क्रमांक – शाळा क्रमांक 31,गट क्रमांक 7( वृध्दाश्रम) 4) उत्तेजनार्थ – शाळा क्रमांक 11,गट क्रमांक 1( विद्यार्थी सुरक्षा समिती) उत्कृष्ट लेखन – शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहां) उत्कृष्ट नेपथ्य- शाळा क्रमांक 125,गट क्रमांक 7( धरती की फिर्याद) उत्कृष्ट अभिनय मुलगा- मोगली पात्र शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहां) उत्कृष्ट अभिनय मुलगी- शारदा पात्र शाळा क्रमांक 31,गट क्रमांक 7( वृध्दाश्रम) नृत्य विभाग इयत्ता 1 ते 5 1) प्रथम क्रमांक – शाळा क्रमांक 18,गट क्रमांक 2 (धनगर नृत्य) 2) द्वितीय क्रमांक – शाळा क्रमांक 64, गट क्रमांक 6,(राम आयेंगे) 3) तृतीय क्रमांक- शाळा क्रमांक 96, गट क्रमांक 7 (शिक्षण नृत्य)…

आत्माराम मोरे साखळी कॅरम स्पर्धा

प्रसाद मानेला विजेतेपद   मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क सुपर लीग कॅरम चँम्पियनशिप स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेने विजेतेपद पटकाविले. दडपण न घेता अचूक सोंगट्या टिपणाऱ्या उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू  प्रसाद मानेने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्न गोळेचा सहाव्या निर्णायक सामन्यात १२-४ असा चुरशीचा पराभव केला आणि प्रसादने अजिंक्यपदाला गवसणी घातली. सुरुवातीचे बोर्ड हातचे निसटल्यामुळे प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या-उपविजेत्यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे व सुरेश मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. दादर-पश्चिम येथील सिबीईयू हॉलमध्ये रंगलेल्या स्पर्धेत युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने तृतीय तर पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेने चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला.  महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे निधी सावंत, देविका जोशी, केतकी मुंडले, पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे, नारायण गुरु स्कूलचा उमैर पठाण, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम आदी उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. पंचाचे कामकाज क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, ओमकार चव्हाण आदींनी केले. राज्य क्रीडा दिनानिमित को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने संपन्न झालेला कॅरमचा शालेय उपक्रम पूर्णपणे मोफत स्वरूपाचा होता. खेळाडूंच्या पालकवर्गाने सुपर लीग कॅरम स्पर्धेच्या आयोजनाची मुक्तकंठाने स्तुती केली.

आज पासून ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाला सुरवात 

 दिल्लीत खो-खोचा जल्लोष, जगभरातील संघ दाखल नवी दिल्ली, : भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून खो-खो विश्वचषक २०२५ ला भव्य सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगासाठी २३ देशांतील ३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत २० पुरुष आणि १९ महिला संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत. दिल्लीतील वातावरण क्रीडारसिकांच्या उत्साहाने भरले असून, खो-खोचा जल्लोष आजपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. दिल्लीत जणू जागतिक क्रीडा महोत्सवाला आज पासून सुरवात झाली असून आज भारताच्या राजधानीत खो-खो चा आवाज घुमणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील संघांचे दिल्लीत आगमन झाले आहे. पारंपरिक भारतीय क्रीडाप्रकार असलेल्या खो-खोचा आधुनिक ग्लोबल स्वरूप आज या स्पर्धेत पहायला मिळणार आहे. दिल्लीत खो-खोचा कुंभमेळा राजकीत वाटचालीत अनेक दिग्गज नेते एकमेकांना खो देत आपले राजकारण साधत असतात पण त्याच राजकीय राजधानीत खो-खो पहायला व तो आवाज ऐकायला क्रीडा रसिकांना मात्र स्वर्गीय आनंद मिळणार आहे. पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषकासाठी जगभरातून संघ दाखल झाले असले तरी खरा आनंद खो-खो क्रीडा कार्यकर्त्यांच्या तोंडावर भरभरून वाहताना दिसतोय. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम या ऐतिहासिक स्पर्धेचे साक्षीदार होणार आहे, जिथे भारतीय परंपरेतून उगम पावलेल्या या खेळाचा जागतिक व्यासपीठावर एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी खो-खो साठी आख्खी हयात घालवली आज त्यांना कोण आनंद होत असेल हा विचारच खूप काही सांगून जातो. एक काळ असा होता कि खो-खोचे कीट (बनियन व हाफ पँट) हे मिळवणे व ते अंगावर घालणे यात खूप कष्ट तर होतेच पण त्याचा अभिमान सुध्दा खूप असायचा. काही खेळाडू तर फक्त या कीट साठी खेळायचे. आज खो-खो च रूपड पालटलं आहे. खेळाडूंना भरभरून सुविधा उपलब्ध होत आहेत. आज खेळाडू खेळाडूंवर भरभरून बक्षिसे मिळत आहेत. खेळाडू विमानाने प्रवास करू लागले आहेत. हजारो, लाखो नव्हे तर आता करोडो रुपयांचे बक्षीस मिळवताना खो-खो खेळाडू दिसणार आहेत. एकेकाळी अत्यंत साध्या स्वरूपात खेळला जाणारा हा खेळ आता आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला आहे. यामुळे खो-खो खेळाच्या प्रगतीचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. संघांचे आगमन : पहिल्यांदा श्रीलंका आणि पेरू हे संघ दिल्लीमध्ये दाखल झाले. ११ जानेवारीला जवळजवळ १४ देशांचे संघ दाखल झाले. तर काल पर्यंत २३ पैकी एखाद दुसरा देश वगळता सर्वच संघ दिल्लीत पोहचल्याचे भारतीय महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले. आशियाई संघांची जबरदस्त उपस्थिती आशियाई संघांनी या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. इराण, मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाळ आणि दक्षिण कोरिया हे संघ आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या देशांमध्ये मध्यंतरीच्या काळात आपल्या देशातून प्रशिक्षक दिले होते व त्या-त्या देशात खो-खो सुरु झाला व आता ते संघ पुरुष आणि महिला गटांमध्ये जोरदार लढत देतील, अशी अपेक्षा आहे. पाश्चात्त्य देशांची नवी वाटचाल,  खो-खो ची मुसंडी पाश्चात्त्य देशांमध्ये अमेरिका, पोलंड, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांचा सहभाग विशेष ठरणार आहे. या देशांमध्ये खो-खो हा खेळ नव्याने सुरु झाला असला तरी त्यांचा सहभाग त्या-त्या देशांमध्ये खो-खो खेळाला सरावाने आपला करू लागले आहेत.  याशिवाय, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धातील देशही उत्साहात सहभागी झाले आहेत. अर्जेंटिनाचा सहभाग दक्षिण अमेरिकेतील खो-खोला मिळालेली देणगी ठरणार आहे. यापूर्वी भारत व इंग्लंड या देशांनी एकमेकांच्या देशात जाऊन खो-खो स्पर्धा खेळली होती. त्यामुळेच इंग्लंडचा सहभाग या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवताना दिसतो. संघांचे आगमन आणि सराव सत्र: दिल्लीमध्ये आगमन झालेल्या सर्व संघांचे सराव सत्र सुरू झाले आहेत. त्या-त्या संघांचे प्रशिक्षक या विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंच्या रणनीतींवर काम करत आहेत. या सरावाच्या निमित्ताने स्टेडियमच्या परिसरात उत्साह निर्माण झाला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम पारंपरिक भारतीय सजावटीसह विविध देशांच्या रंगांनी नटले आहे. या सोहळ्यात खेळाडूंच्या सांस्कृतिक आदान-प्रदानाची झलक पाहायला मिळणार आहे.

‘पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा चिनी मांजा वापरू नये’

 – ठाणे महापालिकेचे आवाहन ठाणे (१२): पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा किंवा चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच…

राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा

भाजपा राज्य अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन मुंबई : जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी  बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, प्रकाश जावडेकर, खा. नारायण राणे, खा. अशोक चव्हाण तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश न मिळाल्याने कार्यकर्ते निराश झाले होते. त्या निकालातून आम्ही बरेच काही शिकलो. त्या नैराश्यातून संघटनेला बाहेर काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी योजना आखली. पुण्यात झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक आपण जिंकणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीमुळेच आपण हा विजय मिळवू शकलो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमापुढे मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत  बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत बसविण्याचे काम आम्ही करू, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. गेल्या अडीच वर्षांत राज्यात पक्ष संघटनेतर्फे झालेल्या विविध अभियानांची माहितीही  बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी यावेळी संघटन पर्व अंतर्गत राज्यात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.