Month: January 2025

प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान उंचावण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धा महत्त्वाची – छायादेवी शिसोदे

अनिल ठाणेकर ठाणे : विद्यार्थ्यांना कला सादर करताना पाहून आनंद होतो त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा मंच प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे आत्मसन्मान उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नाट्य, गीत, समुह गीतं, समुह नृत्य अशा विविध कलागुणांना उंचावर घेऊन जाण्यासाठी विशेष शिक्षकांनी मोलाची भुमिका बजावली आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा २०२४-२५, एन. के. टी. सभागृहात १० जानेवारीला पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळा शेलवली बांगर येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सेस फंडातून जिल्हा स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मंच देण्यासाठी आणि विविध गुण सादर करण्यासाठी ही स्पर्धा मोलाची आहे असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी प्रास्ताविक करताना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक विभागातील कार्यक्रम उत्तमरित्या सादर केले जात आहेत. यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत मोलाचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले यांनी दिल्या. डोंबारी समाजातील बांधवांनी आपल्या कलागुणांना सादर करीत उदरनिर्वाह केला आहे. त्यांना येणाऱ्या विविध समस्या समाजासमोर मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांची जाणीव नृत्याच्या माध्यमातून करून देण्यासाठी “नाचतो डोंबारी” या गाण्यावर सादरीकरण करताना “नाचतो डोंबारी, आम्ही कसरत करतो जगण्यासाठी, वाजले का ती घंटा शाळेची माझ्यासाठी” असा संदेश विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करताना दिला ही आनंदाची बाब आहे असे मत व्यक्त जिल्हा परिषद शाळा बौद्ध पाडा, केंद्र खातीवली येथील मुख्याध्यापक संतोष जाधव यांनी व्यक्त केले. तालुका स्तरावरील विजेता विद्यार्थ्यांनी आज जिल्हा स्तरावर सादरीकरण करण्यासाठी उत्साही वातावरणात सहभाग नोंदविला. लोकनृत्य – इ. 2 री ते 8 वी गट, समूहगान (लहान गट) – इ. 1 ली ते 5 वी, समूहगान (मोठा गट) – इ. 6 वी ते 8 वी, वक्तृत्व (लहान गट) – इ. 1 ली ते 5 वी, वक्तृत्व (मोठा गट) – इ. 6 वी ते 8 वी, नाट्य – इ. 1 ली ते 8 वी गट सादरीकरण प्रत्येक तालुक्यातील पाच लोककला व लोकनृत्य विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले. यावेळी एन. के. टी शाळा संस्थापक नानजीभाई ठक्कर, उपशिक्षणाधिकारी अरूण शिंदे, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, विस्तार अधिकारी शिक्षण देवदत्त शिंदे, एन. के. टी. हायस्कूलचे मुख्याध्यापक लिडीया सैलियन, जिल्हा  समन्वयक अनिल कुऱ्हाडे, जिल्हा समन्वयक भरत वेखंडे, परीक्षक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व सहायक शिक्षक यातील तज्ञ परीक्षक उपस्थित होते  तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन रवींद्र तरे यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे मोलाचे काम केले  आहे. या कार्यक्रमास सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी नास्ता, चहा व दुपारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, तसेच विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी वाहतूक भत्याची रक्कम या पूर्वीच पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आली असून कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग लाभला तसेच कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्था याबाबत उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे. ०००

आगासन गाव येथे अखंड हरिनाम सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात सम्पन्न

दिवा : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या…

कोकणात प्रथमच कुंभवडे (राजापूर) येथे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा शोध

पुणे-  कुंभवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारके पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी प्रथमच उजेडात आणली असून यामुळे कोकणच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाशझोत पडणार आहे. कोकणातील या…

२६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश – चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२ जानेवारी रोजी ००.०१ वाजल्यापासून  ते  २६ जानेवारी २०२५ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात १४ जानेवारी रोजी जिल्ह्यात मकर सक्रांत दिन साजरा केला जाणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी  आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी  बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करा – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : १०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला सोयी सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात येत आहे. तसेच कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीला गैरहजर राहणारे वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे. बैठकीला विनापरवानगी गैरहजर राहण्यासोबत भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा या बाबींवर भर दिला जात आहे. उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.१०) महाड, पोलादपुर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, १५वा वित्त आयोग १०० टक्के खर्च करणे, स्वच्छ भारत अभियानातंर्गत करण्यात आलेली कामे यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी १०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. भरत बास्टेवाड यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्या.सदर आढावा सभेस महाड तालुक्यातील वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे हे विनापरवानगी गैरहजर राहिले होते. तसेच मोतिसिंग लहानुजी भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना निलंबीत करण्यात आले आहे. सदर आढावा सभेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महाडच्या गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पोलादपुरच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट, सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव आण्णा कटरे तसेच सर्व विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते.

मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. कंपनीच्या समपहरण केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव

अशोक गायकवाड रायगड : मे.इझिनॉक्स स्टिल्स लि.कंपनीच्या समपहरण केलेल्या मालमत्तेचा तहसील कार्यालय, खालापूर येथे सोमवार, २३ डिसेंबरला जाहीर लिलाव होणार आहे. लिलाव घेण्यास कोणीही न आल्यास किंवा योग्य बोली न लागल्यास सचिन किर्दत, तलाठी सजा सावरोली यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रु. १/- नाममात्र बोलीवर लिलाव घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.अशी माहिती खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे. मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. तर्फे डायरेक्टर सुधीर गुप्ता, रा. आनंदवाडी-सावरोली, ता. खालापूर, यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी, विनिर्दिष्टी केलेल्या मालमत्तेचे समपहरण करण्यात आले असून विक्रीसाठी यामध्ये निश्चित केलेल्या दिवसापूर्वी तलाठी सजा सावरोली यांना, देय रक्कम दिली नसेल तर, उक्त मालमत्ता, तिच्यावर बसविण्यात आलेल्या सर्व भारापासून व तिच्या संबंधात करण्यात आलेली सर्व अनुदाने व संविदा यांपासून मुक्त, अशी मालमत्ता तहसिल कार्यालय, खालापूर येथे सोमवार,दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, जाहीर लिलावाव्दारे विकण्यात येणार आहे, असे खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी कळविले आहे. गाव आनंदवाडी भू- मापन क्रमांक व पोट-विभाग सं. नंबर क्रमांक ५/१, क्षेत्र (चौमी) ४ हजार ७००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार संबंधीत क्षेत्रासाठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार क्षेत्र रु.३८१० चौमी साठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, देय असलेल्या जमीन महसूलीची थकबाकी १ कोटी ०२ लाख २२ हजार ७६०.

देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण बैठक

रमेश औताडे मुंबई : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त यांच्या सोबत कामगार प्रतिनिधींची एक महत्वाची बैठक दिल्ली येथे  झाली. या बैठकीत देशभरातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन देण्याबाबत लवकरच श्रम मंत्रालयाला केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होण्याची शक्यता आहे. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू होईल. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या शिष्टमंडळाची १० जानेवारी २०२५ भेट झाली. कामगार नेते कॉम्रेड मोहन शर्मा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर, बैजनाथ सिंग या कामगार नेत्यांच्या सोबत दिल्लीचे अप्पर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती या बैठकीत उपस्थित होते. ईपीएफ-९५ वाढीव पेन्शन ” लागू करण्याबाबत देशभरातील सूट दिलेले ट्रस्ट (Examtat trust) मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत श्रम मंत्रालय केंद्र सरकारकडून निर्देश प्राप्त होणार आहेत. निर्देश प्राप्त झाल्यानंतरच वाढीव पेन्शन लागू करण्याबाबत पुढील कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली.

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

कल्याण : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलीसांनी उल्हासनगर येथुन अटक केली असून त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  मानपाडा पोलीस स्टेशनच्या हददीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने हे…

आर्ट एक्झीबीशनला  विद्यार्थ्यांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

 आर्ट स्पॅशच्यावतीने आयोजित ठाणे : आर्ट स्पॅशच्यावतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आर्ट एक्झीबीशनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून अनेक विविध कलाकृती रंगविल्या. आर्ट स्पॅशच्या संचालिका आणि कला शिक्षक नंदा भोसले यांनी समाजसेविका जयश्री शेळके यांच्यासहकार्याने हे प्रदर्शन घोडबंदर रोड येथील हावरे सिटी रोड वरील बिट्स या कलादालनात आयोजित केले होते. 5 ते 55 वयोगटातील ८० विद्यार्थी आणि शिक्षकांनी या प्रदर्शनात भाग घेत विविध कलाकृती साकारल्या. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रदर्शनाला माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी भेट देत विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.

– रामदास स्वामी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त

 शालेय विद्यार्थ्यांना भोजन प्रसादाचे वाटप ठाणे -वर्तकनगर येथील श्री जानकादेवी मंदिरातील पुजारी कैलासवासी रामदास स्वामी बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी थिराणी विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांना भोजन प्रसादाचे…