Month: January 2025

Heading – सरपंच अभिजीत देसक यांच्यावरील कारवाईवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब Slug – जिल्हाधिकारी व अतिरीक्त विभागीय आयुक्तांची अपात्रतेची कारवाई कायम पालघरः डहाणू तालूक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत देसक यांच्यावर करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला असून देसक यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिजीत देसक यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले होते. अतिक्रमणामुळे त्यांचे  सरपंचपद धोक्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती. अपिलामागून अपिले जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी घेतलेल्या सुनावणीत देसक यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले होते. त्या विरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केले. अतिरीक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी देसक यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. तेथेही देसक यांच्या विरोधाची अपात्रतेची कारवाई कायम राहिली. त्या विरोधात देसक यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. एका जागेवर नव्हे, तर दोन जागांवर अतिक्रमण उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी देसक यांनी सर्वे क्रमांक ३६ मध्ये आपली जमीन नसून ती सर्वे नंबर आठमध्ये आहे, आपल्या आजोबांना सरकारने ही जमीन दिली होती आणि त्यावर आपण घर आणि गाळे बांधले आहेत, अतिक्रमण केलेलेच नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांमार्फत केला. डहाणूच्या तहसीलदारांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे, सर्वे नंबर ३६ मधील बांधकामाला नोटीस दिलेली असताना प्रत्यक्षात आपले  बांधकाम सर्वे क्रमांक आठमध्ये असल्याचा पवित्रा देसक यांच्या वतीने घेण्यात आला होता. पितळ उघडे उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयांचे वेगवेगळे निकाल उद्भूत करण्यात आले. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड मागवून त्याची तपासणी करण्यात आली. न्यायालयापुढे देसक यांच्या वकिलांनी, प्रतिवादीच्या वकिलांनी बाजू मांडली. मंडळ अधिकारी यांनी दिलेला अहवाल न्यायालयाने तपासला. ग्रामपंचायतीने दिलेल्या पावतीचा आधार देसक यांनी घेतला. घर क्रमांक ३४ हे सर्वे नंबर आठ मध्ये असून हे घर तसेच सर्वे नंबर ३६ मधील अतिक्रमण ही बेकायदेशीर असल्याचे या वेळी निष्पन्न झाले. या नियमानुसार कारवाई दोन्ही अतिक्रमणे सरकारी जागेवर असल्याने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत कायदा १९५८ च्या कलम १४ (१) (ज ३) नुसार केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.  जिल्हाधिकारी तसेच अतिरीक्त विभागीय आयुक्तांनी देसक यांना अपात्र ठरवण्याची केलेली कारवाई नियमानुसार असून या विरोधात देसक यांनी केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले असून त्यामुळे त्यांच्या सरपंच पदाच्या अपात्रतेच्या कारवाईवर शिक्का मोर्तब झाला आहे.   अन्य अतिक्रमणधारक पदाधिकाऱ्यांचे दणाणले धाबे देसक यांना या निर्णयाने चांगलाच धक्का बसला असून पालघर जिल्ह्यात अतिक्रमित जागेवर निवासस्थाने किंवा व्यापारी संकुले बांधून तेथे राहणाऱ्या किंवा नफा कमवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पंचायत समित्यांचे  सभापती तसेच जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना  तसेच नगरसेवकांना त्यातून चांगलाच धडा मिळणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. यांनी पाहिले काम या प्रकरणात देसक यांच्या वतीने ॲड. एस.एस. रेडेकर, योगेश राऊळ, नितीन भोईर, प्रवदा राऊत आणि मोहिनी थोरात यांनी, तर प्रतिवादी जानी शंकर वरठा यांच्या वतीने प्राजक्त अर्जुन वाडकर, प्रथमेश हंड, जुई घरत यांनी काम पाहिले.

जिल्हाधिकारी व अतिरीक्त विभागीय आयुक्तांची अपात्रतेची कारवाई कायम पालघरः डहाणू तालूक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत देसक यांच्यावर करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला असून देसक यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिजीत देसक यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले होते. अतिक्रमणामुळे त्यांचे  सरपंचपद धोक्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती. अपिलामागून अपिले जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी घेतलेल्या सुनावणीत देसक यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले होते. त्या विरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केले. अतिरीक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी देसक यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. तेथेही देसक यांच्या विरोधाची अपात्रतेची कारवाई कायम राहिली. त्या विरोधात देसक यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. एका जागेवर नव्हे, तर दोन जागांवर अतिक्रमण उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी देसक यांनी सर्वे क्रमांक ३६ मध्ये आपली जमीन नसून ती सर्वे नंबर आठमध्ये आहे, आपल्या आजोबांना सरकारने ही जमीन दिली होती आणि त्यावर आपण घर आणि गाळे बांधले आहेत, अतिक्रमण केलेलेच नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांमार्फत केला. डहाणूच्या तहसीलदारांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे, सर्वे नंबर ३६ मधील बांधकामाला नोटीस दिलेली असताना प्रत्यक्षात आपले  बांधकाम सर्वे क्रमांक आठमध्ये असल्याचा पवित्रा देसक यांच्या वतीने घेण्यात आला होता. पितळ उघडे उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयांचे वेगवेगळे निकाल उद्भूत करण्यात आले. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड मागवून त्याची तपासणी करण्यात आली. न्यायालयापुढे देसक यांच्या वकिलांनी, प्रतिवादीच्या वकिलांनी बाजू मांडली. मंडळ अधिकारी यांनी दिलेला अहवाल न्यायालयाने तपासला. ग्रामपंचायतीने दिलेल्या पावतीचा आधार देसक यांनी घेतला. घर क्रमांक ३४ हे सर्वे नंबर आठ मध्ये असून हे घर तसेच सर्वे नंबर ३६ मधील अतिक्रमण ही बेकायदेशीर असल्याचे या वेळी निष्पन्न झाले. या नियमानुसार कारवाई दोन्ही अतिक्रमणे सरकारी जागेवर असल्याने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत कायदा १९५८ च्या कलम १४ (१) (ज ३) नुसार केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.  जिल्हाधिकारी तसेच अतिरीक्त विभागीय आयुक्तांनी देसक यांना अपात्र ठरवण्याची केलेली कारवाई नियमानुसार असून या विरोधात देसक यांनी केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले असून त्यामुळे त्यांच्या सरपंच पदाच्या अपात्रतेच्या कारवाईवर शिक्का मोर्तब झाला आहे. अन्य अतिक्रमणधारक पदाधिकाऱ्यांचे दणाणले धाबे देसक यांना या निर्णयाने चांगलाच धक्का बसला असून पालघर जिल्ह्यात अतिक्रमित जागेवर निवासस्थाने किंवा व्यापारी संकुले बांधून तेथे राहणाऱ्या किंवा नफा कमवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पंचायत समित्यांचे  सभापती तसेच जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना  तसेच नगरसेवकांना त्यातून चांगलाच धडा मिळणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. यांनी पाहिले काम या प्रकरणात देसक यांच्या वतीने ॲड. एस.एस. रेडेकर, योगेश राऊळ, नितीन भोईर, प्रवदा राऊत आणि मोहिनी थोरात यांनी, तर प्रतिवादी जानी शंकर वरठा यांच्या वतीने प्राजक्त अर्जुन वाडकर, प्रथमेश हंड, जुई घरत यांनी काम पाहिले.

ठाणे पूर्वेत आई गांवदेवी-चिखलादेवीचा यात्रा महोत्सव

ठाणे : सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार, १३ जानेवारीला आई गांवदेवी (चिखलादेवी) चा यात्रा महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  ते  पुढे…

पत्रकारांना भेडसावणाऱ्या टोलमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

-प्रविण दरेकरांचे आश्वासन राजेंद्र साळसकर सांगली : पत्रकार एखाद्या नेत्याची दिशा बदलू शकतात तशीच दशाही बदलू शकतात, ही ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते. पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांनी अनेक इतिहास उभे केलेत. अनेक विषय चव्हाट्यावर मांडून ते मार्गी लावण्याचे काम याच मातीतील पत्रकारांनी केले आहेत. पत्रकारांना भेडसावणाऱ्या टोलमाफीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांशी बोलून तालुका व जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, असे आश्वासन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले. सांगलीतील ऐतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘पत्रकार सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर बोलत होते. याप्रसंगी वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, भाजपा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत, स्थानिक आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार भगवान साळुंखे, वनश्री दूध संघाचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांसह शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना संबोधित करताना दरेकर म्हणाले कि, आज मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहे तो कार्यक्रम पत्रकारांचा आहे. जी पत्रकारिता चळवळ उभी केली गेली त्या चळवळीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. दरेकर पुढे म्हणाले कि, आज पत्रकारांचा सन्मान होतोय. मीही एक साप्ताहिक चालवतो. त्यामुळे छोट्या पत्रकारांच्या व्यथा, अडचणी काय असतात याची नीट माहिती व आकलन मला आहे. ग्रामीण, तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतेय. पत्रकारांनी जो टोलमाफीचा प्रश्न सांगितला आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन व तालुका, जिल्ह्याच्या पत्रकारांना सवलत कशी मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही दरेकरांनी यावेळी पत्रकारांना दिला. विरोधी पक्षाचे नेते असेल तरी विकासासाठी सहकार्य करण्याची गरज या प्रसंगी बोलताना दरेकर म्हणाले की, वारणा शिक्षण संस्थेचे डॉ.प्रतापराव पाटील यांचे सहकारातील योगदान आणि निष्ठा पाहून माझ्यासारखा कार्यकर्ताही प्रभावित झाला. डॉ.प्रतापराव विरोधी गटाचे असतानाही आम्ही त्यांना मदत केली. कारण, ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आणि कर्तृत्व आहे त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हा विचार आम्ही केला व ऐतवड्याचा सुपुत्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाला, सहकाराचे नेतृत्व करायला लागला. ही शिकवण आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी दिलीय. विरोधी पक्षाची लोकं असली तरी विकासासाठी काम करण्याची गरज आहे. निवडणुका, पक्ष, विरोध निवडणुकीपुरता असतो. परंतु सर्वांचा अंतिम उद्देश समाजाचा विकास हाच असतो. तोच विचार घेऊन प्रतापराव पाटील यांच्याशी जवळीक वाढल्याचे दरेकर म्हणाले. सहकारात नावीन्यपूर्ण प्रयोगाची गरज – दरेकरांचे प्रतिपादन याच कार्यक्रमात बोलताना दरेकर यांनी सहकारात नावीन्यपूर्ण प्रयोग करत चांगल्या कल्पना घेऊन आम्ही काम करतोय. मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना मुंबई बँक मार्फत सुरु केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहितीही दिली. मुंबई बँकेच्या सहकार्यातून स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून विलेपार्ले येथे उभ्या राहिलेल्या नंददीप सोसायटीचे कालच उदघाटन केले असून येथील रहिवासी ३४० स्क्वे. फुटाच्या घरातून १४०० स्क्वे. फुटाच्या घरात राहायला गेली असून अशा अनेक इमारती स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत. सहकारी चळवळ वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण अशा कल्पना घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

मुलाच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईचे देखील निधन

सोयगाव: मुलांच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईने ही जगाचा निरोप घेतला ही घटना सोयगाव तालुक्यातील तिडका येथे घडली. तिडका येथील पांडुरंग नामदेव गवळी (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने शनिवार सायंकाळी सहा वाजता निधन झाले. काही वेळाने आई निर्मलाबाई नामदेव गवळी( वय ७०)  यांची प्रकृती बिघडली. त्यांना नातेवाईकांनी गोदेंगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार झाल्यानंतर काही वेळाने तिडका येथे घरी आणले असता रविवार पहाटे तीन वाजता त्यांचे देखील निधन झाले.. तिडका येथील स्मशानभूमीत पांडुरंग गवळी यांच्यावर शनिवारी रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तर निर्मलाबाई गवळी यांच्यावर रविवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या निधनानंतर अवघ्या नऊ तासात आईने देखील जगाचा निरोप घेतल्याची घटना घडल्याने तिडका गावात शोककळा पसरली होती. ०००००

डहाणू येथे सीपीआयएमकडून मित्रपक्षांचा मेळावा

अनिल ठाणेकर पालघर : गेल्या आठवड्यात, पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सीपीआय(एम) ने महाविकास आघाडीमधील आणि बाहेरील मित्रपक्षांच्या ३०० हून अधिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. डहाणू  विधानसभा जागेवर सीपीआय(एम) चे उमेदवार विनोद निकोले यांचा विजय सुनिश्चित करण्यात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला. या विजयात यंदा सीपीआय(एम) ला १,०४,००० पेक्षा जास्त मते मिळाली, जी २०१९ मध्ये मिळालेल्या विजयापेक्षा ३२,००० मतांनी जास्त होती. डहाणूतील विजयाने महाराष्ट्रात आलेल्या भाजप-महायुतीच्या त्सुनामीला आव्हान दिले गेले. यात लक्षणीय बाब म्हणजे, १९७८ पासून झालेल्या गेल्या ११ राज्य विधानसभा निवडणुकांपैकी १० निवडणुकीत सीपीआय(एम) ने डहाणू (अज) जागा (जी २००९ मध्ये सीमांकनापूर्वी जव्हार-अज जागा होती) जिंकली आणि ती देखील पाच वेगवेगळे उमेदवार देऊन. दिनांक ७ जानेवारी रोजी झालेल्या या मेळाव्याच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या (एआयकेएस) स्थापनेचा ८०वा वर्धापन दिन होता. कॉम्रेड शामराव आणि गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली १९४५ साली ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे हे स्थापना अधिवेशन झाले होते, आणि त्यानंतर लगेच मे १९४५ मध्ये ऐतिहासिक व विजयी आदिवासी उठावाची सुरुवात तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या तलासरी-डहाणू भागात झाली होती. या मेळाव्याला संबोधित करणाऱ्यांमध्ये सीपीआय(एम) पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि पुनर्निर्वाचित आमदार विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि जिल्हा सचिव किरण गहला, राष्ट्रवादी-शरद पवार यांचे नेते काशीनाथ चौधरी, कीर्ती मेहता आणि मिहिर शाह, शिवसेना-उद्धव ठाकरे यांचे नेते अजय ठाकूर, काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पाटील, कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो आणि बहुजन विकास आघाडीचे नेते अरुण निकोले यांचा समावेश होता. सर्व वक्त्यांनी भाजप आणि महायुतीवर सडकून टीका केली आणि लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीला बळकट आणि व्यापक करण्याचे आणि दीर्घकाळापासून रखडलेल्या ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे आणि जिंकण्याचे बुलंद आवाहन केले.

मकर संक्रांतीला पतंग उडवताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नवी मुंबई : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात, त्यामुळे याला ‘पतंगांचा सण’ असेही म्हटले जाते. मकर संक्रांती सणाच्या अगदी आधी,नायलॉन किंवा कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनविलेल्या आणि /…

अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर

पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे…

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

जालना : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज जालना येथे मोर्चा काढण्यात आला.   या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहभाग घेतला. जालना…

बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात- उद्धव ठाकरे

मुंबई : महापौर बंगला ही वास्तू म्हणून आम्ही पाहात नाही, आमचं त्याच्याशी भावनिक नातं आहे. शिवसेना प्रमुख आणि युतीच्या अनेक बैठका याठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे या वास्तुचं वैभव जपून तिथे काम करणे अवघड होती. महापौर बंगला एक भावनात्मक…