Month: January 2025

घोडबंदर रोडवर वाहतूक शाखेकडून बस चालकांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न

30 जणांच्या तपासणीत 8 वाहनचालकांना मोतीबिंदू ठाणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय व फोर्टिस हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ढचढ बस चालकांकरीता घोडबंदर रोड आनंद नगर बस डेपो येथे प्रादेशिक परिवहन…

रोटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे ‘आठवणीतले खेळ’

विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी उपक्रम कल्याण : रोटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे नुतन विद्यालय कल्याण पश्चिम येथे एक अभिनव उप्रकम राबविण्यात आला. हा…

उत्तर भारत  थंडीने हैराण

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरल्याने दृश्यमानता कमालीची घटली. त्यामुळे किमान २५ रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह डझनहून अधिक राज्यांत धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची घटली होती. जम्मू-काश्मीरात काही ठिकाणी तापमानात वाढ…

वन इलेक्शनबाबत झाली जेपीसीची पहिला बैठक

नवी दिल्ली : देशातील लोकसभा आणि सर्व राज्यांमधील विधासभा निवडणुका एकत्र घेण्याची तरतूद असलेल्या दोन विधेयकांवर विचारविनिमय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. भाजपाचे…

मनसेचे नगर अभियंत्याला दणका

मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून केलं अनोखे आंदोलन ठाणे –  ठाणे शहरातील मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्यांनी आज अनोखे आंदोलन केले. त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीतील नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून मैदान अतिक्रमणमुक्त…

गणेश नाईकांचा शिंदेंवर निशाणा

ठाणे : नेताच जर चुकीचा असेल तर सगळी यंत्रणाच चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये त्यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि…

खारघरमध्ये बिबट्या ; नागरिकांमध्ये घबराट

पनवेल– खारघरमध्ये आता कोल्ह्यांपाठोपाठ बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांता एकच घबराट पसरली आहे. मागील दोन दिवसापासून खारघर हिलवर बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे येथील आदिवासी वाडीतील नागरिकांनी पाहिले आहे.वनविभागाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.…

खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन !

ठाणे : डॉ. अंजली गांगल, ६३ वर्षे, या खोपट बस डेपो येथे विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मीटिंगसाठी आल्या होत्या. कार्यालय शोधत असताना त्या मैत्रिणीची वाट पाहत थोडा वेळ तेथील बाकावर बसल्या आणि काही कामासाठी पैशाची पर्स बाहेर काढली. तेवढ्यात दुसरा फोन आला आणि त्या लगबगिने आपली पर्स तेथेच सोडून पहिल्या मजल्यावर गेल्या. पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि वीस हजार रुपये होते. त्यांना आपली पर्स हरवल्याचे लक्षातही आले नव्हते, पण त्याच दरम्यान त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून दोन-तीन वेळा पाठोपाठ फोन आला. एसटी महामंडळाचे पोलीस कर्मचारी श्री विक्रम सुभाष जाधव यांना ती पर्स सापडली होती. त्यांनी पर्स तपासून त्यातील एलआयसीच्या पावतीवरील फोन नंबर पाहिला आणि संपर्क साधून डॉ. गांगल यांना त्यांच्या पर्सची माहिती दिली आणि न्यावयास येण्यास सांगितले. ओळख पटवल्यावर त्यांना त्यांची पर्स परत दिली. श्री. जाधव यांचा प्रामाणिकपणा आणि सेवाभाव समाजातील माणुसकीचे दर्शन घडवतो. अशा चांगल्या नागरिकांमुळे माणुसकीवरचा विश्वास पुन्हा दृढ होतो आणि समाजाला प्रेरणा मिळते

मुंबई-गोवा महामार्गला आता  जूनच मुहुर्त !

नवी दिल्ली: मुंबई-गोवा महामार्गला आता जूनचा मुहुर्त मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा मुहुर्त दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे…