Month: January 2025

मंदिरांतील वस्त्रसंहिता स्वागतार्हच !

  देशभरातील लक्षावधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले. मंदिर प्रशासनाने एक पत्रक काढून तसे जाहीर केले आहे. मुंबईच्या मध्यवर्ती…

देशातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकीय पुढाऱ्यांनी गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करावे

अहिंसेच पुजारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारीला साजरी करण्यात येते.त्या निमित्ताने भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांवर अंकुश लावण्याकरिता राज्य व केंद्र सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे. याकरीता…

करार आणि गुंतवणूक

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथील जागतिक परिषदेला हजेरी लावून गुंतवणुकीचे अनेक करार केले. दरवर्षीच असे करार होत असतात. त्यातील किती गुंतवणूक प्रत्यक्षात होते आणि…

‘आरटीई’ प्रवेशासाठी २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे : ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती…

शिवसेनेतर्फे आदिवासी भागात घोंगडी वाटप !

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य  शशिकांत झोरे यांच्या  माध्यमातून शिवसेना शाखा क्र.१२ तर्फे बोरिवली नॅशनल पार्क मधील आदिवासी नागरिकांना विभागप्रमुख  उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते ब्लँकेट वाटप  करण्यात आले. याप्रसंगी विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, विधानसभा संघटक सौ शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख सचिन शिर्के, उपविधानसभा समन्वयक सारिका झोरे, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, शाखा संघटक शुभदा सावंत, शाखा समन्वयक माधुरी खानविलकर, युवासेना सचिन शिरसाट, वृषल पुसाळकर, आशिष सोंडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन  शशिकांत झोरे यांच्या सह  उपशाखा संघटक सौ इति महाडिक, रईसा मुल्ला, सुलभा गावकर, सोनाली रोकडे यांनी यशस्वीपणे केले.

संविधान गौरव अभियान

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा ठाणे शहर जिल्हाचे वतिने ठाणे :  २५ जानेवारी २०२५ संध्याकाळी ६ वाजता भाजपा विभागीय कार्यालय वर्तक नगर रेमंड ठाण्यात करण्यात आले.  या कार्यक्रमात प्रमुख वक्ते माजी केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील साहेब यांनी डॉ. बाबासाहेब अम्बेडकर द्वारा लिहलेला संविधान बद्दल सहविस्तार माहीती दिली तसेच या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निरंजन डावखरे साहेब भाजपा ठाणेशहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले साहेब भाजपा ठाणेशहर उपाध्यक्ष विक्रम भोईर माजी नगरसेविका सुवर्णा विलास कांबळे अनुसूचित जमाती ठाणेशहर जिल्हाध्यक्ष नताशा सोनकर दिव्यांग सेल ठाणेशहर जिल्हाध्यक्ष आनंद बनकर अनुसूचित जाती मोर्चा ठाणेशहर सरचिटणीस  तेजश चंद्र मोरे उपाध्यक्ष , अरुणा कांबले उपाध्यक्ष  राजेश करोतिया उपाध्यक्ष  सुरेश बहिलम  कोषाध्यक्ष  रामनिवास दिलोड मोर्चाची ठाणे शहर विधान सभा संयोजक रशमी मोरे मोर्चा ठाणे शहर मिडिया प्रमुख  दिनेश मोरया मोर्चातिल पदाधिकारी  सुनिल सोदा  संदीप गहलोध व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणेशहर जिल्हाध्यक्ष  विरसिंह पारछा यांचे नेतृत्वाखालील संविधान गौरव अभियानाचा कार्यक्रम करण्यात आले.

नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल

रमेश औताडे मुंबई :राज्यातील सरकारी आरोग्य विभागात महत्वाची भूमिका बजावणारी स्टाफ नर्स व स्टाफ ब्रदर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आरोग्य विभागात ९०० जागा रिक्त असताना जर आम्हाला आंदोलन करत नोकरी मागावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव नसावे. असे यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना अभिलाष टेकाडे यांनी सांगितले की, वयोमर्यादा संपून गेल्यावर जर आम्हाला नोकरी मिळत असेल किंव्हा मयत झाल्यावर नोकरी मिळणार असेल तर त्या नोकरीचा काय फायदा. सरकारने जर आता आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करणार नसेल तर राज्याची आरोग्य यंत्रणा बंद पडू शकते असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्या उमेदवारांनी दिला आहे.

जीवनदान देण्यासाठी पुढे आले ११० रक्तदाते

रमेश औताडे मुंबई : कराड को -ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोपरखैरणे नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेने सलग २५ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. नवी मुंबई विभागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ११० रक्तदात्यानी  रक्तदान केले. यावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई सागर नाईक, विभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आंनदराव कचरे, उपाध्यक्ष डी. आर. पाटील आणि सर्व संचालक व कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.

कृषी उद्योगातील परिवर्तनासाठी एआयएम कॉन्क्लेव्ह सज्ज

मुंबई : भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIM B2B ) बीटूबी परिषद आयोजित केली आहे. एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एक विशेष प्रदर्शनासह या परिषदाचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजन केले आहे. येत्या ३ आणि ४ मार्च २०२५ रोजी ही परिषद होईल अशी माहिती एआयएम असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव समीर पाथरे आणि खजीनदार सर्जेराव शिसोदे उपस्थित होते. कृषी- निविष्ठा (इनपुट) उद्योगाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसचे भारतातील कृषी- निविष्ठा (इनपुट)  उद्योगाला बळकटी देण्याचा प्रयत्न या परिषदेव्दारे केली जाणार आहे, ज्यामुळे जोडणी, सहयोग आणि वाढीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. हा कार्यक्रम उत्पादक, पुरवठादार, उद्योग तज्ञ आणि उद्योजकांना संधी शोधण्यासाठी,  नियामक चौकटींवर चर्चा करण्यासाठी आणि बायोस्टिम्युलंट्स, जैव कीटकनाशके आणि जैव खतांमधील नवीनतम प्रगती प्रदर्शित करण्यासाठी एकत्र आणेल. शंभर हून अधिक स्टॉल्स या परिषदेत मांडली जाणार आहे. त्याशिवाय अत्याधुनिक कृषी निविष्ठा (इनपुट)  उपाय, नाविन्यपूर्ण कच्चा माल आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन यात सादर होणार आहे. परिषद सत्रांमध्ये बायोस्टिम्युलंट नियम, कर धोरणे, उद्योग आव्हाने आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल अंतर्दृष्टी.  उद्योग नेटवर्किंग: B2B कृषी-इनपुट क्षेत्रातील प्रमुख घटकांना जोडणारे विशेष नेटवर्किंग सत्रे,  लघू आणि मध्यम उद्योजकीय क्षेत्रातील लहान आणि उदयोन्मुख व्यवसायांकडून सहभागाला प्रोत्साहन देणे. , आयात अवलंबित्व कमी करणे: आयात केलेल्या कच्च्या मालाला पर्याय म्हणून भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देणे. व्यवसाय संबंध निर्माण करण्यासाठी आणि बाजार विस्ताराच्या संधींचा शोध घेण्यासाठी या व्यासपीठाचा फायदा घेण्यासाठी देशभरातून खत तसेच शेती औषधे तसेच उत्पादन उपयुक्त मिशनरी, आधुनिक शेती तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेतील स्टॉलच्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणूनच उत्पादक, पुरवठादार, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिकांना या परिवर्तनकारी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन धुरगूडे पाटील यांनी केले. नोंदणी, प्रायोजकत्व आणि स्टॉल बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी, abc.aimassociationindia.com ला भेट द्या किंवा +९१ ९६८९१५२८३७ वर संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समीर पाठारे यांनी केले आहे. PHOTO CATION मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित अखिल भारतीय अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करताना असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगूडे पाटील. सोबत सचिव समीर पाथरे आणि खजिनदार सर्जेराव शिसोदे.

कल्याणमधील चिंचपाडा येथील बेकायदा जीन्स कारखाने जमीनदोस्त

 प्रदूषणामुळे रहिवासी होते हैराण कल्याण – कल्याण पूर्वेतील आय प्रभागातील चिंचपाडा भागातील २२ जीन्सचे कारखाने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पोलीस बंदोबस्तात पालिका तोडकाम पथकाच्या साहाय्याने मंगळवारी जमीनदोस्त…