सतीश प्रधान यांची रविवारी शोकसभा
ठाणे :ठाणे शहराचे शिल्पकार सतीश प्रधान यांचे श्रेय वादातीत आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी, ५ जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात आयोजन…
ठाणे :ठाणे शहराचे शिल्पकार सतीश प्रधान यांचे श्रेय वादातीत आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी, ५ जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात आयोजन…
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मानले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आभार अनिल ठाणेकर कल्याण डोंबिवलीसह नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता दिल्याने कल्याण डोंबिवलीसह २७ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाणी पुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवलीकरांना शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत असून राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथे कुस्तीच्या सरावा करिता येणाऱ्या , मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयातील कुस्तीपटूंनी पालघर…
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हाउसिंग फेडरेशन आदरणीय सन्मानीय मा. श्री.सीतारामजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 🎂🌷💐 वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ज्योती भगत भारतीय मराठा महासंघ विभाग प्रमुख उद्योग आघाडी घोडबंदर रोड व मानवता सेवा चे सदस्य व हिरानंदानी इस्टेट आणि सोहम गार्डन च्या मॅनेजर व मित्र परिवार उपस्थित होते.
अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी२०२५ चा लोकशाही दिन सोमवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात १…
रमेश औताडे मुंबई : भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर असा जप काय करता, असा सवाल तुच्छतेने लोकसभेत केला. त्यातून नवा वाद उभा करून इतर विषयावरील प्रश्न व चर्चा थांबवत त्यांनी अदानीला वाचवले. आणि लोकसभेत त अदाणी वरील चर्चेतून भाजपचीही खुबीने सुटका केली. असा स्पष्ट आरोप संविधान तज्ज्ञ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी केला. मुंबईतील धारावी येथे बौद्ध, मातंग, चर्मकार कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. सुरेश माने यांच्यासह दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, मातंग समाजातील नेते प्रबुद्ध साठे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या मेळाव्यात मार्गदर्शक होते. आपल्याला भरकटवून सरकारवर शेकणाऱ्या मुद्द्यांपासून भाजप पक्ष स्वतः ची सुटका करून घेत आहे. इतरांनी लादलेल्या अजेंड्यावर काम करण्याचे आपण थांबवणार आहोत की नाही ? असा सवाल यावेळी डॉ. सुरेश माने यांनी केला. प्रास्ताविक भाषण या मेळाव्याचे एक निमंत्रक आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक दिवाकर शेजवळ यांनी केले. तर, सूत्रसंचालन चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर यांनी केले.
रमेश औताडे मुंबई : गेल्या २९ वर्षांमध्ये ११ हजारहून अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर , दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन…
कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी मुंबई : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार, ४ जानेवारीपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजतां परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील श्री देव गिरोबा मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महा आरती तसेच पारंपारिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात येणार आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे २७ वे वर्ष असून रविवार, १२ जानेवारी २०२५ पर्यंत कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे. रोज सायंकाळी ७ वाजतां श्री देव गिरोबाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजतां दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली.
2,102 अनधिकृत बांधकामांचे निष्कासन; 2 लाख चौ.मी. हून अधिक क्षेत्र केले अतिक्रमणमुक्त नवी मुंबई : विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता…