Month: January 2025

‌‘सहमती एक्सप्रेस‌’ला ग्रीन सिग्नल

खातेवाटप पार पडले असले तरी महायुतीच्या सहमती एक्सप्रेसला ट्रॅकवर यायला बराच काळ लागला. मिळालेल्या भरपूर जागांमुळे मित्रपक्षांवर दबाव आणून महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न होता; परंतु एकनाथ शिंदे…

भारताला वीज पुरवून नेपाळ मालामाल

भारताचा शेजारी देश नेपाळ काही महिन्यांपासून भारताला मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा करत आहे. नेपाळ विद्युत प्राधिकरणा (एनई) नुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये नेपाळने 13 अब्ज नेपाळी रुपये किंवा सुमारे…

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले

महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज म्हणजे ३ जानेवारी २०२३ रोजी १९४ वि जयंती. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म…

मौत के कुएँ!

  देशात कूपनलिका आणि विंधन विहिरींच्या खड्ड्यात पडून अनेक बालकांचा मृत्यू झाला. त्यात अपवादात्मक ‘प्रिन्स’ अशा विंधन विहिरी आणि कूपनलिकांच्या खड्डयातून बाहेर आले. देशभरातील अशा घटना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने…

 सिडकोची अनधिकृत बांधकामांवर सन 2024 मध्ये प्रभावी कार्यवाही

 2,102 अनधिकृत बांधकामांचे निष्कासन; 2 लाख चौ.मी. हून अधिक क्षेत्र केले अतिक्रमणमुक्त नवी मुंबई  :  विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली,  सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखालील नियंत्रक अनधिकृत बांधकामे विभागातर्फे सन 2024 मध्ये सिडको अधिकारक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहिमा राबवून 2,102 अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली व 2,06,431 चौ.मी. क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहराच्या विकासामध्ये अडथळा ठरणारी व शहराला विद्रुपीकरण करणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही सिडकोतर्फे नियमितपणे पार पाडण्यात येते. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सन 2024 या वर्षामध्ये 547 निष्कासन मोहिमांचे आयोजन करून 302 यशस्वी मोहीमांदरम्यान सिडको संपादित जमिनींवरील 2,102 अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. निष्कासित करण्यात आलेल्या बांधकामांमध्ये कच्ची बांधकामे, आरसीसी बांधकामे, टपऱ्या इ. समावेश होता. निष्कासन कारवाई करण्यापूर्वी 2,160 अनधिकृत बांधकाधारक/अतिक्रमणधारकांना एमआरटीपी अंतर्गत नोटीसा बजावून बांधकाम निष्कासित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या मोहींमादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्थानकांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी वेळोवेळी योग्य तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला. नवी मुंबई क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू (एमटीएचएल), उलवे सागरी मार्ग, नवी मुंबई मेट्रो, सिडकोचे गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्यात आले असून व इतर पायाभूत सुविधा प्रकल्प नियोजित किंवा प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील लौकिक अधिक वृद्धींगत होत असताना अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या विकासाला बाधा येऊ नये याकरिता अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामांविरुद्ध आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमा महत्त्वाच्या ठरतात. निष्कासन मोहिमांव्यतिरिक्त, नागरिकांना सावध करण्याकरिता सिडकोतर्फे अतिक्रमणधारक/अनधिकृत बांधकामधारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसा वेळोवेळी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात येतात. तसेच नागरिकांनी नवी मुंबई किंवा नैना क्षेत्रामध्ये सदनिका किंवा दुकाने खरेदी करताना संबंधित बांधकामाबाबतची कागदपत्रे तपासावीत व संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहनही सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

मुंबई होणार स्टार्ट अपची उपराजधानी

मुंबई : सेवा क्षेत्राची राजधानी मानल्या गेलेल्या मुंबईने स्टार्टअपमध्येही गती पकडण्यास सुरूवात केली आहे. देशातील सात मोठ्या शहरांच्या केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईने या क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावला असून शहरात ३६ नवे…

रत्नागिरीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहोळ्याचे  शानदार उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय या प्रशालेचा शतक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री मान.  श्रीपादजी नाईक यांच्या  उपस्थित पार पडला. भविष्यात गुणवत्ताधिष्टित  शिक्षणासाठी शिक्षण पद्धतीत बदल केले जात…

 पानसरे हत्या प्रकरण

 तपासावर देखरेख सुरू ठेवायची आवश्यकत नाही मुंबई : दोन फरारी आरोपीबाबतचा तपास वगळता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे. त्यामुळे, दोन फरारी आरोपींच्या कारणास्तव प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख सुरूच ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरूच ठेवण्याबाबत पानसरे कुटुंबीयांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. उपरोक्त निर्णय देताना, याप्रकरणी सुरू असलेला खटला जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने खटल्याची सुनावणी दररोज घ्यावी, असे आदेशही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने कोल्हापूर येथील विशेष न्यायालयाला दिले. तसेच, फरारी आरोपींना अटक झाल्यास तपास यंत्रणेने त्याबाबत विशेष न्यायालयाला माहिती द्यावी, असेही न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांची याचिका निकाली काढताना स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालानुसार आरोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही. पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे, या प्रकरणावरही न्यायालयाच्या देखरेखीची आवश्यकता नसल्याचा दावा प्रकरणातील दोन आरोपी वीरेंद्र तावडे आणि शरद कळसकर यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे केला होता. तसेच, पानसरे कुटुंबीयांची याचिका निकाली काढण्याची मागणी केली होती. त्यांची याचिकाही न्यायालयाने यावेळी निकाली काढली. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांनी आधी प्रकरणाचा विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) तपास करण्याची मागणी केली होती. मात्र, आता हत्येच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. गेली दोन वर्षे हाच दावा केला जात आहे. परंतु, तपास यंत्रणेने सर्व पैलूंनी प्रकरणाचा तपास केला आहे. दोन फरारी आरोपी वगळता आता तपास करण्यासारखे काहीच राहिलेले नाही, असे न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाने पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवताना स्पष्ट केले होते. त्याचवेळी, पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी करता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांच्या मुख्य सूत्रधारांचा शोधच घेण्यात आला नसल्याच्या दाव्याबाबत म्हटले होते. पानसरे कुटुंबीयांची मागणी पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर. साहित्यिक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार सारखेच असून त्यांचा शोध तपास यंत्रणांनी अद्याप लावलेला नाही. किबंहुना, त्या पैलूने तपास यंत्रणांनी प्रकरणाचा कधी तपासच केला नाही. त्यामुळे, तपास सुरू ठेवण्याचा आणि त्यावर देखरेख ठेवण्याचा आग्रह पानसरे कुटुंबीयांच्या वतीने वरिष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी युक्तिवाद करताना केला होता. तपास यंत्रणेचे म्हणणे काय होते? प्रकरणाचा तपास सुरू आहे. तो थांबवण्यात आलेला नाही. मात्र, दोन फरारी आरोपी वगळता तपास करण्यासारखे काहीच राहिलेले नाही. दोन्ही फरारी आरोपींचा छडा लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. याशिवाय, खटलाही जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. हत्येच्या प्रत्यक्षदर्शी आणि पानसरे यांच्या पत्नीची साक्ष त्यांच्या वयोमानामुळे आलेल्या आजारपणामुळे अद्याप नोंदवण्यात आलेली नाही. परंतु, तीही लवकरच नोंदवली जाईल, असे विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले होते. ०००००

 अभिनेते-दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान

 पनवेलमध्ये राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पनवेल : दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला १ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.   रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टीआयपीएल तर सहप्रायोजक निल ग्रुप आहेत. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस  रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी प्रसार माध्यमांना पुढे माहिती देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, मराठी रंगभूमीला गेली अनेक वर्ष अनेक चांगले कलाकार अभिनेते दिग्दर्शक लाभले.  त्यांनी त्या काळात त्यांच्या मेहनतीवर मराठी रंगभूमी यशस्वीरित्या उभी केली, वारसा पुढे वाढवला. अशाच काही कलाकारांचा गुणगौरव हा अटल करंडकच्या रंगमंचावर करण्यात येतो. अटल करंडकच्या ८ व्या वर्षी पासून “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर, ज्येष्ठ अभिनेते कै. जयंत सावरकर, प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना गौरविण्यात आले आहे. यंदा प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व ५० हजार रुपये पन्नास हजार असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. गेली दहा वर्षे चाललेल्या अटल करंडक स्पर्धेने टप्प्याटप्याने उच्चांक गाठला आहे. कोरोना काळातही एवढ्या मोठ्या स्तरावर अटल करंडक ही एकमेव स्पर्धा होती जी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरीत्या संपन्न झाली, स्पर्धेच्या ८व्या वर्षी कोरोना चे सर्व निर्बंध पाळत कोरोना काळातही प्राथमिक फेरीसाठी जवळपास १०६ संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी देखील अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला प्राथमिक फेरीसाठी १०८ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १४ डिसेंबर २०२४ पासून विभागनिहाय प्रारंभ झाला, जळगाव व नागपूर केंद्र, पुणे सातारा केंद्र, कोल्हापूर केंद्र, रायगड (पनवेल) केंद्र, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या केंद्रांवर संपन्न झाली. प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून आशीर्वाद मराठे आणि मानसी दोषी मराठे यांनी हि कामगिरी यशस्वीरित्या पार पाडत महाअंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट अशा २५ एकांकिकांची निवड केली आहे. निवड झालेल्या संघाची महाअंतिम फेरी १०,११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे, असून परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, प्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी हे काम पाहणार आहेत.  एकांकिका स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच कोणत्यातरी एकांकिका स्पर्धेचा “ब्रॅण्ड अॅम्बेसिडर” अशी एक नाविन्यपूर्ण संकल्पना सुरु करण्यात आली . अटल करंडक मधून जो कलाकार विजेता आहे आणि आज तो यशस्वीरित्या या क्षेत्रात कार्यरत आहे अशा एका कलाकाराला आम्ही ‘ब्रँड अॅम्बेसिडर” चा मान देण्याचे ठरविले होते त्यानुसार सुप्रसिद्ध अभिनेता “ओंकार भोजने” याची नियुक्ती बँड अॅम्बेसिडर म्हणून अटल करंडक च्या ८ व्या वर्षासाठी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ९ व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम, निरागस विनोदीवीर “पृथ्वीक प्रताप” यांची, मागील वर्षी म्हणजेच १० व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता सि के टी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि अटल करंडक आणि मल्हार करंडक मधील स्पर्धक अजिंक्य ननावारे यांची निवड करण्यात आली होती. या वर्षी सुप्रसिद्ध बिग बॉस फेम, माझ्या नवऱ्याची बायको फेम आणि अटल करंडक ची २०१८ ची स्पर्धक अभिनेत्री “रुचिरा जाधव”  ‘ब्रँड अॅम्बेसिडर” आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अटल करंडक एकांकीका स्पर्धेमध्ये एकूण रुपये २ लाख ७० हजाराची मुख्य पारितोषिके आणि ३८ हजार रुपयांची वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतात. तसेच प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशी मिळून ४ लाखाची पारितोषिके देण्यात येतात. प्रथम पारितोषिक ०१ ;लाख रुपये प्रमाणपत्र व मानाचा अटल करंडक, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, चतुर्थ पारितोषिक २५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिकअसून त्यांना १० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेला १५ हजार रुपये, तसेच वैयक्तिक गटात उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, नेपथ्य, संगीत, लाईट, लेखक आणि दिग्दर्शक, विनोदी कलाकार, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार यांनाही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने पनवेल मधील दिवंगत लोकप्रिय नाट्य कलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे, अशीही माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, मल्हार महोत्सवाच्या निमित्ताने एकांकिका स्पर्धा सुरु झाली. ती गेल्या १० वर्षात अटल करंडकच्या रूपाने राज्यस्तरीय स्पर्धा झाली. कोरोनाच्या काळात आयोजन करणारी आणि यशस्वी अशी एकमेव स्पर्धा ठरली.  कलाकारांना व्यासपीठ आणि सन्मान देण्याचे काम या स्पर्धेतून होत आहे, याचे आम्हाला आयोजक म्हणून समाधान आहे. सीकेटी महाविद्यालयाचे कला क्षेत्रात असलेले काम आणि सहभागामुळे स्पर्धा परिपूर्ण झाली असून त्याचबरोबरीने टीम अटल करंडक मेहनत घेऊन काम करत आहे. या स्पर्धेच्या नियोजनाचे नेहमीच कौतुक होत असून यशस्वीतेमुळे अटल करंडकला प्रतिष्ठा प्राप्त झाली. निल गुपचे विलास कोठारी व कल्पना कोठारी, पनवेल महापालिका, कलाकार आणि रसिकांचा नेहमीच पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिला असून त्या अनुषंगाने कार्यशाळा तसेच प्रशिक्षण वर्गही यापूर्वी घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्यामनाथ पुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले कि, “रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा” हे ब्रीद वाक्य घेऊन गेली १८ वर्ष पनवेल मध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आधी सात वर्ष ही स्पर्धा “मल्हार करंडक” या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली जात होती. गेली १० वर्ष ही स्पर्धा “अटल करंडक” या नावाने राज्यस्तरीय स्वरूपात आयोजित केली जात आहे. यंदाचे ह्या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. नाटय चळवळ वृद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो, असेही त्यांनी सांगितले. ००००००