Month: January 2025

 ठाणे महापालिका क्षेत्रात डिसेंबर महिन्यात हटवले ३८९१ अनधिकृत फलक

 ७६ प्रकरणात गुन्हे दाखल   ठाणे : डिसेंबर-२०२४मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधून ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या मार्फत डिेसेंबर महिन्यात ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्तांमार्फत सातत्याने सुरू आहे. एकूण ७६ प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दिली. महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत, मा. उच्च न्यायालयाचेही अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक लावण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक लावता येणार आहेत. त्याबाबत संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे. 00000

महाराष्ट्राचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करा : शेलार

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी दिले.…

दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे पश्चिम डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील सुभाष रोड. क्रांतीपासून ते अगदी मारूती मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारांच्या बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच ठेकेदाराने केलेल्या खोदाईमुळे या परिसराला…

जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा ६ जानेवारीला – गुरुशांत हरळय्या

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा उद्योंग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार, ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी दिली आहे. विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार ‘राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यात प्रचालन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उ‌द्योजक, नवउ‌द्योजक, औ‌द्योगिक संस्था व संघटना, औ‌द्योगिक समूह, औ‌द्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उ‌द्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले आहे. ००००

नाशिकमधून 4763 टन द्राक्ष निर्यात

 हंगामास सुरुवात, राज्यात 37 हजार 732 शेतकऱ्यांकडून निर्यातीसाठी नोंद   हरिभाऊ लाखे नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, मलेशिया, सिंगापूर, ओमान या देशामध्ये 312 कंटेनरमधून 4763 टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, निर्यातीचे कंटेनर रवाना झाला आहे. याबाबत द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी माहिती दिली की, यंदा या द्राक्ष पिकाला अवकाळी व थंडीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला आहे. युरोपीय देश वगळता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनर या द्राक्षांच्या हंगामात कमी निर्यात झाली आहे. यंदा महाराष्ट्रामधून 37 हजार 732 शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंद केली असून, मार्च 2025 पर्यंत मुदत असल्याने यात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त द्राक्ष निर्यातीसाठी द्राक्षांची नोंद करावी आणि ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार औषधांची फवारणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे करण्यात आले आहे. द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन 2023-2024 हंगामात तब्बल 3 लाख 43 हजार 982 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 3460 कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. नाशिकच्या द्राक्षांना जागतिक बाजारात स्थान गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे. 0000

बीकेसी-कुलाबा भुयारी मेट्रो प्रवास लवकरच

मुंबई : ‘एमएमआर’मधील वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांचा प्रवास सुकर, सुसाट करण्यासाठी, कोणत्याही ठिकाणांहून इच्छितस्थळी ५९ मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मेट्रो, सागरी सेतू, उन्नत रस्त्यासह अन्य प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून ‘ग्रोथ हब’ संकल्पनेनुसार केला जाईल. नववर्षात विकास केंद्राच्या आराखड्यातील ३० प्रकल्पांच्या कामाला टप्प्याटप्प्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करेल. अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई अर्थात नवनगर वसविले जाईल. या नवनगरचा आराखडा तयार करून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा, तसेच ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात आरे-कुलाबा असा थेट भुयारी प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कुलाबादरम्यानची भूमिगत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. एमएमआरमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेषत्वाने एमएमआरडीएकडून मेट्रोसह अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यानुसार नव्या वर्षात एमएमआरडीएकडून कामे सुरू असलेली कोणतीही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची चिन्हे नाहीत. यासाठी मुंबईकरांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गृहनिर्मिती एमएमआरमध्ये ३० लाख रोजगार निर्मितीसह आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यादृष्टीने २०२५ मध्ये कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. नवनगरसाठी भूसंपादन अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नवनगरासाठी भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिला टप्प्यातील स्मारक जानेवारीअखेरीस खुले होण्याची शक्यता आहे. तर वसई – विरार आणि मिरा – भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून त्याद्वारे वसई-विराराला पाणीपुरवठा केला जात आहे. आता दुसरा टप्पा येत्या काही महिन्यात पूर्ण करून मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास केंद्र एमएमआरडीएकडून एमएमआरच्या विकासासाठी मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राबविले जात आहेत. पण आता संपूर्ण एमएमआरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. निती आयोगाने एमएमआर ग्रोथ हबची शिफारस केली आहे. निती आयोगाच्या शिफारशीनुसार एमएमआर ग्रोथ हबचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता ग्रोथ हबमधील ३० प्रकल्पांना एक – एक करून नव्या वर्षात सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमआरचा २०३० पर्यंत आर्थिक विकास करून अर्थव्यवस्था मजबूत केली जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मार्च २०२५ मध्ये बीकेसी-आचार्य अत्रे, वरळी मेट्रो स्थानक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. तर जून २०२५ आचार्य अत्रे, वरळी, मेट्रो स्थानक – कुलाबा टप्पा सुरू होईल. हे टप्पे सुरू झाल्यास आरे – कुलाबा असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएकडून सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कुल दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काम नव्या वर्षात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास सिग्नल विरहित आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येईल. ठाणे – बोरिवली २० मिनिटांत ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. तर भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम नव्या वर्षात सुरू होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करून पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना चर्चगेट, मरिन ड्राईव्हला अतिवेगाने जाता यावे यासाठी ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामासही २०२५ मध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले. 00000

ठाणे शहरात वर्षभरात आगीच्या ८०८ घटना

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात २०२४ या वर्षभरात ८०८ आगीच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले…

कुटुंब नियोजनावर ‘पुरुष मौन’!

 कुटुंब नियोजन जनजागृती पंधरवड्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ‘शून्य’   ठाणे : जिल्हा आरोग्य विभागातर्फे नुकतेच कुटुंब नियोजन जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये पुरुषांनी अधिक संख्येने सहभागी होऊन नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ” कुटुंब नियोजनावर बोलू काही ” असे घोषवाक्य असलेल्या या अभियानात पुरुष नसबंदी शास्त्रकियेची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र याकडे जिल्ह्यातील पुरुष वर्गाने पूर्णपणे पाठ फिरवली असून शून्य प्रतिसाद मिळाला आहे. तर या अभियानाच्या पंधरवड्यात ३१८ महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. लोकसंख्या वाढ ही जगाची मोठी समस्या आहे. गेल्या काही वर्षांत शहरी भागात एक किंवा दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेतला जातो. मात्र, ग्रामीण भागात आजही दोनपेक्षा अधिक अपत्ये जन्माला घातली जातात. शासनातर्फे कुटुंब नियोजनासाठी आणि त्याच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे, योग्य ते उपचार देणे, मोफत पद्धतीने दाम्पत्याला गोळ्या – औषधांचे वाटप करून देणे यांसारखे उपक्रम हाती घेण्यात येत असतात. मात्र पुरुष नसबंदीसाठी तयारच होत नसल्याचे सातत्याने दिसून येते. तर यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून नुकताच कुटुंब नियोजन जनजागृती पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये या मोहिम कालावधीत पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत असणारे गैरसमज दूर करून कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले होते. तसेच या मोहिमेचे घोषवाक्य, “आजच सुरुवात करुया, पती-पत्नी मिळून कुटुंब नियोजनावर बोलुया” असे होते. ही मोहिम जिल्ह्यात २ टप्यात राबविण्यात आली. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत माहिती घेण्याकरीता विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. तर आशा व एएनएम, पुरुष नसबंदी पंधवड्याचा प्रचार व प्रसार कार्यक्षेत्रात करून कुटुंब नियोजनास पात्र जोडप्यांना भेटी देऊन पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याच्याशी निगडीत गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशन करुन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा स्वीकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र याकडे पुरुष मंडळींनी पूर्णपणे पाठ फिरवली तर दुसरीकडे महिलांनी पुढाकार घेऊन कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या. जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कुटुंब नियोजन जनजागृती उपक्रमात पुरुषांच्या नसबंदीच्या शून्य शस्त्रक्रिया पार पडल्या. तर ३१८ महिलांनी या नाव नोंदणी करून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुरुषांनी यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र याला पुरुषांचा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची संख्या १ हजार ९६७ इतकी आहे. तर याच कालावधीत पुरुष नसबंदी शत्रक्रिया संख्या अवघी ४ असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गर्भधारणा रोखण्यासाठी केली जाणारी नसबंदीची पारंपरिक शस्त्रक्रिया किंवा वारंवार त्या गोळ्यांचे सेवन केल्याने महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे अनेक अहवालतुन देखील समोर आले आहे. तर दुसरीकडे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया कमी वेळेत होते. मात्र तरीही पुरुखांची संख्या यात नगण्य आहे.

ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : तुळशीधाम येथील धर्मवीरनगर परिसरात सात वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. धर्मवीरनगर येथे एमएमआरडीएच्या इमारती आहेत. या इमारतीजवळील काही वृक्ष तोडल्याबाबतची तक्रार सुमारे २० दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दोन सप्तपर्णी, दोन जंगली उंबर, दोन जंगल चेरी आणि एक अज्ञात वृक्ष असे एकूण सात वृक्ष तोडण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले. अधिकाऱ्यांनी याबाबत वृक्षांची लाकूड वाहून नेणाऱ्यांची चौकशी केली असता, चार जणांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण विभागाने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता. याबाबत आता तक्रारी अर्जानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झाडांचे संवर्धन आणि जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१), २१ (२), ८ आणि महाराष्‍ट्र मालमत्‍ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

डोंबिवलीतील महानगर गॅसचा पुरवठा दुरुस्तीसाठी ८ जानेवारीला बंद

डोंबिवली : मुख्य गॅस वाहिकेच्या दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने महानगर गॅसकडून डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा ८ जानेवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ यावेळेत बंद ठेवण्यात येणार…