Month: January 2025

भडेकर, राऊत, म्हस्के, मोरे, लुंगसेंना

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार   मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ छायाचित्रकार घनश्याम भडेकर यांनी लिहीलेल्या पुस्तकाला यंदाचा प्रतिष्ठेचा जयहींद पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.…

भडेकर, राऊत, म्हस्के, मोरे, लुंगसेंना मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ छायाचित्रकार घनश्याम भडेकर यांनी लिहीलेल्या पुस्तकाला यंदाचा प्रतिष्ठेचा जयहींद पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ललित लेखनासाठी सकाळच्या विनोद…

दलित वस्ती सुधार योजनेची माहिती दलितांनी मागवावी

दलित वस्ती सुधार योजने नुसार प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयास, दलित वस्ती सुधारणा करीता निधी दिला जातो. सदर निधीतून रस्ता खडीकरण, डांबरीकरण, शौचालय, समाज मंदिर इत्यादी कामे या निधीतून फक्त दलित…

पाच सेकंदांचा नियम…

आमच्या लहानपणी असा आजकाल बरेचदा उल्लेख केला जातो. त्याचा अर्थ इतकाच की गेल्या पन्नास साठ वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्यांची यादी खूप मोठी होईल पण काही बाबतीत पूर्वी जे…

चिंताजनक विमान दुर्घटना

दक्षिण कोरियामध्ये जेजू एअरचे बँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान रविवारी मुआन विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात विमान भस्मसात होऊन १७९ प्रवाशी दगावले. या अपघाताने संपूर्ण जगात हळहळ…

अमेरिकेतील भारतियांची चिंता

  सरत्या वर्षातील जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या अशा दोन लोकशाही राष्ट्रांमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जे निकाल लागले ते अत्यंत मह्त्वाचे तर होतेच, पण ते जगावरही दूरगामी परिणाम…

 नववर्ष सीएसाठी लाख मोलाचे

 ८ हजार जणांना नोकऱ्या, २४१ कंपन्या घेणार उमेदवारांना सामावून   मुंबई : चाटर्ड अकाऊंटंट अर्थात सीए झालेल्यांसाठी नववर्ष अतिशय आंनदाचे जाणार आहे. आयसीएआय या संस्थेने तब्बल ८ हजार सीएंना २४१ कंपन्यांमध्ये नोकरी दिली आहे. जानेवारीपासून हे सीए कंपन्यांमध्ये रूजू होतील. यातील सर्वांधिक पगाराचे पॅकेज २६.७० लाख रुपयांचे आहे. आयसीएआयच्या कॅम्पसमध्ये नुकत्याच सीएंच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये नोव्हेंबर २०२३मध्ये परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेले तसेच मे २०२४मध्ये या परी-क्षेत यश मिळवलेल्या सीएंचा समावेश होता. आजवरचा हा ६० वा मुलाखतीचा कार्यक्रम होता. तो फेब्रुवारी २०२४ आणि मे २०२४ या दोन टप्प्यांत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३००२ आणि दुसऱ्या टप्प्यात ४७८२ उमेदवार सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक पगार होता तो २९ लाखांचा जो दीएगो इंडिया या कंपनीने दिला. तर दुसऱ्या टप्प्यात २६.७० लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले. अर्थात नेहमीपेक्षा पगाराचे पॅकेज यावेळी सरासरी पाहता कमीच होते. ते १३.२४ लाख आणि १२.४९ लाख असे खाली घसरले. या मुलाखती देशातील ९ मुख्य केंद्रांवर पार पडल्या. त्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या मोठ्या शहरांचा समावेश होता, त्याचबरोबर २० लहान केंद्रांवरही या मुलाखती घेण्यात आल्या. आयसीएआयचे धीरज खंडेलवाल यांनी सांगितले की, नोकरी मिळालेली आकडेवारी फारच आशादायी आहे. हे क्षेत्र विस्तारत आहे. विविध कंपन्यांमध्ये सीए झालेल्या उमेदवारांना मोठी मागणी आहे. यावेळी मुलाखत घेणाऱ्या कंपन्यांमध्येही मोठी वाढ नोंदवली गेली. येत्या २४ आणि २५ जानेवारीला विदेशातील कंपन्यांमध्ये सीए झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळावी यासाठी विशेष कॅम्प भरवण्यात येणार आहेत. संयुक्त अरब अमिरात तसेच आशिया आणि यूरोप खंडातील अनेक देशांमधील कंपन्या या कॅम्पमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या अभ्यासक्रमाचे जगभरात ९ लाख ८५ हजार विद्यार्थी आहेत, अशी माहितीही खंडेलवाल यांनी दिली.

 यूपीआय वापरणाऱ्यांना आजपासून खास सुविधा

 रिझर्व्ह बँकेचा निर्णय, डिजिटल पेमेंटच्या कक्षेत नवी क्रांती मुंबई : आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण यूपीआय वापरतो, इतकी याची व्याप्ती आता विस्तारली आहे. डिजिटल पेमेंटच्या याच कक्षेत आजपासून नवी क्रांती येत आहे. आजपासून यूपीआय नियमांबाबत मोठा बदल झाला असून रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार यूजर्स आता कोणत्याही यूपीए अॅपचा वापर करून डिजिटल वॉलेटद्वारे पैसे देऊ शकतात. याचा सर्वात मोठा फायदा असा असेल की, कोणत्याही एकाच अॅपवर अजिबात अवलंबून राहावे लागणार नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण केवायसी म्हणजेच नो यूवर कस्टमर अपडेट करणे आवश्यक आहे. पीपीआयधारक त्यांचे इन्स्ट्रुमेंट जसे की गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीमसारख्या यूपीआय अॅप्सशी लिंक करू शकतात. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच फीचर फोन यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता यूपीआय १२३ पे वापरून १० हजार रुपयांपर्यंतचे यूपीआय पेमेंट केले जाऊ शकते. ही सुविधा १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. पूर्वी ही मर्यादा ५ हजार रुपये होती. रिझर्व्ह बँकेने यूपीआय ट्रान्सॅक्शन आणि वॉलेट पेमेंटच्या लिमिट बदलल्या आहेत. ही लिमिट वाढवण्यात आली आहे. नवीन नियमानुसार लोक आता यूपीआय १२३ पे वापरून ५ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतील. आता प्रीपेड वॉलेट फोन पे, यूपीआय आणि पेटीएम वापरणे सोपे झाले आहे, परंतु या नवीन नियमाचा फायदा घेण्यासाठी वॉलेटचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि वॉलेट अॅपशी लिंक असणे आवश्यक आहे. 000000

 मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या विजय वैद्य संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

 ग्रंथ आणि ग्रंथालये हाच विजय वैद्य यांचा श्वास; योगेश वसंत त्रिवेदी यांनी वाहिली आदरांजली   मुंबई : ग्रंथ आणि ग्रंथालये हा विजय वैद्य यांचा श्वास होता. सर्वत्र ग्रंथालये उघडावीत हा त्यांचा ध्यास होता. मंत्रालयातील पत्रकार कक्षात त्यांच्या नांवाने संदर्भ ग्रंथालय सुरू होऊन ते चांगल्याप्रकारे कार्यान्वित होणे या माध्यमातून त्यांची स्मृती चिरंतन राहील, अशा शब्दांत  ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात सुरु करण्यात आलेल्या कै. विजय वैद्य संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन योगेश त्रिवेदी यांच्या आजच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद डोईफोडे हे होते. पत्रकार कक्षात संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यासाठी अशोक शिंदे, नासिकेत पानसरे आणि प्रितम नाचणकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. हे तीनही या बाबतीत वैद्य यांचे मानसपुत्र म्हणावे लागतील, असेही त्रिवेदी यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात कार्यरत असलेले विजय वैद्य यांचे चिरंजीव श्री विक्रांत विजय वैद्य हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. नव्या पिढीतील पत्रकारांनी विविध संदर्भ ग्रंथ अभ्यासले पाहिजेत, वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्यासाठी त्याचा त्यांना नक्कीच उपयोग होईल आणि असे संदर्भ ग्रंथांचे संकलन करून वाचनालयांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विजय वैद्य यांच्या कार्याला आदरांजली ठरेल, असेही योगेश त्रिवेदी यांनी सांगितले. पत्रकार कक्षात झालेल्या या कार्यक्रमास संघाचे सदस्य आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती. या संदर्भ ग्रंथालयात अनेक प्रकारचे जवळपास १२०० ग्रंथ आहेत. या ग्रंथालय प्रक्रियेच्या पूर्णत्वाच्या कार्यात संघाचे सदस्य अशोक शिंदे, नासिकेत पानसरे, प्रितम नाचणकर यांनी सहभाग दिला आहे. विक्रांत वैद्य यांनी विधिमंडळ कामकाजातील नोंदी तसेच त्या संबंधित ग्रंथसंपदा ग्रंथालयात अधिक प्रमाणावर वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली तर ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर यांनी विजय वैद्य यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच पत्रकारांनी एक क्षण तरी विजय वैद्य होण्याचा प्रयत्न करावा, पत्रकारितेतील आदर्श आजच्या पिढीने घेण्याची आवश्यकता विशद केली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ग्रंथालय आधुनिक काळाशी सुसंगत करण्यासाठी तसेच ग्रंथसंपदा वाढविण्याचे प्रयत्न संघाच्या वतीने भविष्यात केले जातील, याची ग्वाही दिली. आभार संघाचे कार्यकारिणी सदस्य खंडुराज गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुयश पडते, विनया पंडित-देशपांडे, महेश पवार, अशोक अडसूळ आदी मान्यवर पत्रकार मंडळी देखील उपस्थित होती. 00000

थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याणमध्ये 320 जणांविरोधात कारवाई

कल्याण :   कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरुबअसून 31 डिसेंबर अनुषंगाने विहित वेळेपेक्षा सुरू असलेल्या 35 आस्थापनावर  कारवाई. तसेच उघड्यावर…