Month: January 2025

 ह्युमॅनिटी स्टील लाईव्हच्या मार्फत अनोखा थर्टी फर्स्ट साजरा

गोरगरीब गरजूंना केले जेवण व ब्लँकेट वाटप   कल्याण :  ह्युमॅनिटी स्टील लाईव्ह च्या मार्फत तेजस सांगळे व त्यांचे सहकारी मुकुल सोनटक्के, आदित्य लासुरे, सुधीर शेट्टी, शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या झुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेले पंधरा वर्षे झाले करण्यात येत आहे.  सरत्या वर्षाला 2024 ला गुड बाय करत 2025 मध्ये वेलकम करत कोणत्यातरी गोरगरिबांचे एक दिवसाचा पोट भरून व त्यांच्या अंगावर वस्त्र देण्यात आले. आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून  प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली. ०००००

 ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे   मुंबई : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी उपस्थित होते. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगार वेतन थकबाकीसंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला. ००००००

माजी आमदार प्रदीप नाईक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई : “किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदारसंघाच्या विकासात…

मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर

मुंबई : पुरस्कार प्राप्त मानकरी : मंगेश मोरे (दै. सामना), घन:श्याम भडेकर (ज्येष्ठ पत्रकार),सचिन लुंगसे (दै. लोकमत), विनोद राऊत (दै. सकाळ), पांडुरंग म्हस्के (दै. सकाळ) मुंबई, गुरुवार : मुंबई मराठी…

3 जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिन नानाविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता…

राष्ट्रीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवड

कल्याण : ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाच्या मान्यतेने ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ३७ वी पुरुष व…

 थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

 थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर होणार कायदेशीर कारवाई   मुंबई : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी केले. राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्या नंतर ३१ डिसेंबर पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्ष्यात घेऊन ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू  ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र ३१ मार्च २०२५ नंतर या योजनेला मुदत वाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असुन थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ९३८४८ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून १३० कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास  कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रँचायझी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे. असा लाभ घ्या संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा  एकदा नियमित  वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल. -मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई 0000

आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल साळुंखे, अंकुश महाले यांच्याकडे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.

अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा मुंबई:- दिल्ली येथे ३ ते ८ जानेवारी  या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरीता स्नेहल साळुंखे या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या महिला संघाची धुरा सोपविण्यात…

५१वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

पुणे ग्रामीण, रायगड, ठाणे शहर उपांत्य फेरीत   सांगली:- पुणे ग्रामीण, रायगड, ठाणे शहर यांनी ५१व्या कुमार/ कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात उपांत्य फेरी गाठली. यजमान सांगलीला मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी “सुवर्ण चढाई” पर्यंत झुंजावे लागले. सांगली विरुध्द पुणे ग्रामीण आणि ठाणे शहर विरुध्द रायगड अशा उपांत्य लढती होतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने राज्य संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सांगली,सांगलीवाडी येथील चिंचबाग मैदानावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सुवर्ण चढाईच्या डावात नंदुरबारचा ३०-२९ असे चकवित उपांत्य फेरी गाठली. सुरवातीपासून अतितटीने खेळला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात १३-१२ अशी आघाडी सांगलीकडे होती. पण नंदुरबारने पूर्ण डावात त्यांना २३-२३असे बरोबरीत रोखले. ही कोंडी सोडविण्याकरीता ५-५ चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. त्यानंतर ही २९-२९ अशा बरोबरीत हा डाव संपला. शेवटी सामन्याच्या नियमानुसार सुवर्ण चढाई देण्यात आली. त्याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात आली. नंदुरबारच्या बाजूने नाफेकीचा कौल लागला. पण नंदुरबारचा खेळाडू चढाईत गुण घेऊ न शकल्याने पंचाने त्याला बाद दिले. आणि सांगलीने एकच जल्लोष केला. आदित्य येसगुडे, व्यंकटेश वडार यांच्या झंझावाती चढाया त्यांना ओम् शिंदे, प्रतीक जाधव यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे सांगलीला हा विजय मिळविता आला. प्रणव मराठे, आलम मंसुर, पृथ्वीराज गलांडे पाटील, अतुल रोठोड यांचा खेळ नंदुरबारच्या विजया करीता थोडासा कमी पडला. पुणे ग्रामीणने ५-५ चढाईत कोल्हापूरचे आव्हान ३१-३० असे संपविले. पहिल्या डावात १३-१० अशी आघाडी घेणाऱ्या पुणे ग्रामीणला कोल्हापूरने पूर्ण डावात २५-२५ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे दोन्ही संघाना ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात एका गुणांनी पुणेकरांनी बाजी मारली. प्रणव भांगर, साहिल माने यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोल्हापूरच्या समर्थ देशमुख, शुभम रेपे यांनी शेवटच्या १० मिनिटात भन्नाट खेळ करीत. सामन्यात बरोबरी साधली. पण विजय मात्र त्यांच्या पासून दूरच राहिला. रायगडने परभणीवर ३८-३३ अशी मात केली. विश्रांतीला १९-१२ अशी आघाडी घेणाऱ्या रायगडला परभणीने नंतर कडवी लढत दिली. राज मोरे, नीरज मिसाळ यांच्या दमदार चढाया त्यांना समीर हिरवे, हर्ष सुकर यांची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळेच रायगडने हे साध्य केले. परभणीच्या रमेश गायकवाड, बाबुराव जाधव, विजय तारे यांनी विश्रांतीनंतर आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. शेवटच्या सामन्यात ठाणे शहरने मुंबई उपनगर पश्र्चिमचा ३७-३३असा पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत ठाण्याने पहिल्या डावात २१-१२ अशी मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात उपनगरने आपला खेळ गतिमान करीत ही आघाडी कमी करीत आणली. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. आफताब मंसूरी, आदित्य पिनाने, सोहम जाधव यांच्या सर्वांगसुंदर खेळाने ठाण्याने हा विजय साकारला. उपनगरच्या ओम् कुदळे यांनी आक्रमक चढाया करीत ही आघाडी कमी केली. पण पायाला असलेल्या दुखापतीमुळे तो आपल्या संघाला पूर्ण न्याय देऊ शकला नाही. त्याला अर्शद चौधरी, अश्विन देसाई यांची मोलाची साथ लाभली. विजयापासून मात्र उपनगर दूरच राहिले.

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २४-२५

साईराज स्पोर्टस्, आंबेवाडी, ज्ञानेश्र्वर, श्री गणेश यांची पुरुष द्वितीय श्रेणीच्या उपांत्यपूर्व फेरीत.   मुंबई : श्री साईराज स्पोर्टस्, आंबेवाडी मंडळ, ज्ञानेश्र्वर मंडळ, श्री गणेश क्लब यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष द्वितीय श्रेणीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या पुरुषात आंबेवाडीने ५-५ चढायांच्या डावात वीर नेजाजीचा प्रतिकार ३३-३२ असा संपविला. पूर्वार्धात ११-१९ अशा पिछाडीवर पडलेल्या आंबेवाडीने पूर्ण डावात २७-२७ अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामन्याचा निर्णय लावण्याकरीता प्रत्येक संघाला ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात आंबेवाडीने ६-५ अशी सरशी साधली. साहिल शेलार, भावेश वाघ यांनी आंबेवाडी कडून, तर आदित्य चव्हाण, विजय कदम वीर नेताजी कडून उत्कृष्ट खेळले. साईराज स्पोर्टस् ने जिजामाता नगर सार्वजनिक गणेश मंडळाचा ३३-२२ असा पाडाव केला. विश्रांतीला ११-०६ अशी आघाडी घेणाऱ्या साईराजने नंतर देखील त्याच तडफेने खेळत आपला विजय साकारला. जिजामाताचा जयदास पायमोळी चमकला. ज्ञानेश्वर मंडळाने श्री गावदेवीला ४५-२८ असे नमवित आगेकूच केली. पूर्वार्धात २५-१० अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानेश्वरने उत्तरार्धात आपल जोश कायम ठेवत हा विजय साकारला. राहुल जुईकर, प्रणव कणेकर यांच्या चतुरस्त्र खेळाने ही किमया साधली. श्री गावदेवीचे विकास घाग, आदित्य शेलार बरे खेळले. श्री गणेश क्लबने अमेय बिरमोळे, श्रीकांत मोरे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर हिंदकेसरीचा ३०-१६ असा सहज पराभव केला. हिंद केसरीचा प्रणव वराडकरची लढत एकाकी ठरली. शिवनेरी मंडळाने जय खापरेंश्वरचा ३१-१२ असा, तर श्री साईनाथ मंडळाने बाल उत्कर्षला ३१-११ असे पराभूत करीत आगेकूच केली. 00000